एफ-४ इंडियन चॅम्पियनशिप स्थळाजवळ आग

अग्निशमन दलाने तातडीने मिळवले नियंत्रण; मोठा अनर्थ टळला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
एफ-४ इंडियन चॅम्पियनशिप स्थळाजवळ आग

मोपा: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या ‘ एफ-४ इंडियन चॅम्पियनशिप’ या चित्तथरारक स्पर्धेला शनिवारी जल्लोषात सुरुवात झाली असली, तरी काही अप्रिय घटनांमुळे स्पर्धेच्या आयोजनवर चिंतेचे सावट पसरले. आज रविवारी दुपारी या रेसिंग ट्रॅकच्या परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने, अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.




तत्पूर्वी, शनिवारी पहिल्याच दिवशी कार रेसिंगदरम्यान दोन वेगवेगळे अपघात घडल्याने स्पर्धेला गालबोट लागले. एका कारने दुसऱ्या गाडीला धडक दिल्याने पहिली घटना घडली, तर दुसऱ्या घटनेत ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात एकूण तीन गाड्यांचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मदत पथकाने क्रेनच्या साहाय्याने या गाड्या बाजूला हटवून मार्ग मोकळा केला. या अपघातांनंतर स्पर्धेच्या नियोजनाबाबत काहीशी नाराजी व्यक्त होत असली, तरी प्रेक्षकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. 



हेही वाचा