महिला टी-२० विश्वचषकात भारताचा धमाका

दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी पराभव; सलग दुसऱ्यांदा जिंकला १९ वर्षांखालील किताब

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd February, 10:20 pm
महिला टी-२० विश्वचषकात भारताचा धमाका

क्वालालंपूर : १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा ९ गडी राखून पराभव करून सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त ८२ धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने फक्त १ विकेट गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.       

या स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे. तत्पूर्वी, भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडला ९ गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत सहज प्रवेश केला होता. २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही ट्रॉफी जिंकली होती.      

गोलंदाजांच्या बळावर संघ जिंकला      

महिला १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकांत फक्त ८२ धावांवर ऑलआउट झाला. टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्यासाठी फक्त ८३ धावांची आवश्यकता होती. ज्याचा भारतीय संघाने सहज पाठलाग केला. भारताकडून जी त्रिसाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.


हेही वाचा