केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाला लेदर बॉल क्रिकेटचे विजेतेपद

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd February, 10:22 pm
केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाला लेदर बॉल क्रिकेटचे विजेतेपद

पणजी : क्रीडा संचालनालय आयोजित लेदर बॉल क्रिकेट विभाग ३ टुर्नामेंटमध्ये केशव स्मृती उच्च माध्यमिक विद्यालयाने जेतेपद पटकावले. अंतिम सामना फातोर्डा येथे रंगला.

अंतिम सामन्यात केशव स्मृतीने आरएमस उच्च माध्यमिक विद्यालयाचा २४ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करून केशव स्मृतीने २० षटकांत १०४ धावा केल्या. यात कातिर्क सिंगने २८ धावा केल्या तर अभिनवने २३ धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना आरएमसने केवळ ८० धावाच केल्या. त्यामुळे केशव स्मृतीचा २४ धावांनी विजय झाला. केशव स्मृतीतर्फे युवराज रावने ९ धावा देऊन ४ गडी बाद केले. अनुजने ८ धावा देऊन २ गडी बाद केले. कार्तिक सिंगने १५ धावा देऊन २ गडी बाद केले. मदन मज्जगी याने २५ धावा देऊन २ गडी बाद केले.