नागपुरात अभिषेक, रिंकूचा वादळी तडाखा

टीम इंडिया ४८ धावांनी विजयी : पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडचा फडशा, मालिकेत १-० आघाडी

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
36 mins ago
नागपुरात अभिषेक, रिंकूचा वादळी तडाखा

नागपूर : आगामी टी-२० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने आपला विजयी रथ कायम राखला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ४८ धावांनी पराभव केला. अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने ही महत्त्वाची लढत जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून भारताने २३८ धावांचा विशाल डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही भारताची आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. भारतीय फलंदाजांच्या तुफानी फटकेबाजीपुढे किवी गोलंदाजांची लय पूर्णपणे बिघडलेली पाहायला मिळाली.
ग्लेन फिलिप्सची झुंज अपयशी
२३९ धावांच्या कठीण लक्षाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली असली तरी ग्लेन फिलिप्सने एकाकी झुंज दिली. त्याने अवघ्या ४० चेंडूत ७८ धावांची वादळी खेळी केली. मात्र, १४ व्या षटकात तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव कोसळला. इतर फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर तग धरता आला नाही.
वाढत्या धावगतीचा दबाव
न्यूझीलंडने शेवटपर्यंत संघर्ष केला, पण वाढत्या धावगतीचा दबाव आणि भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्यामुळे त्यांना निर्धारित षटकांत केवळ २०० धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी, भारताने हा सामना ३८ धावांनी जिंकून मालिकेची विजयाने सुरुवात केली.
तत्पूर्वी, नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धावांचा पाऊस पाडला. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढत २० षटकांत ७ विकेट्स गमावून २३८ धावांचा डोंगर उभा केला. हा भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.
अभिषेकची वादळी फलंदाजी
सलामीवीर अभिषेक शर्माने आज मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ३५ चेंडूंमध्ये ५ चौकार आणि ८ गगनभेदी षटकारांच्या मदतीने ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. अभिषेकला शतकाने हुलकावणी दिली असली, तरी त्याच्या या खेळीने भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.
रिंकू सिंगचा ‘फिनिशिंग’ टच
डावाच्या अखेरच्या टप्प्यात रिंकू सिंगने आपल्या नावाप्रमाणेच ‘बेस्ट फिनिशर’ची भूमिका बजावली. रिंकूने २० चेंडूंत २२० च्या स्ट्राईक रेटने नाबाद ४४ धावा कुटल्या. यात ३ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, डावाच्या २० व्या षटकांत रमध्ये रताने २१ धावा वसूल केल्या, ज्यात रिंकूच्या फटकेबाजीचा मोठा वाटा होता.
कर्णधार सूर्या आणि हार्दिकची साथ
अभिषेक आणि रिंकूच्या सोबतीला कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. सूर्याने ३२ धावांची आक्रमक खेळी केली, तर हार्दिकने २५ धावा जोडल्या. संजू सॅमसनला केवळ १० धावा करता आल्या, तर इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

सूर्यकुमारचे नागपुरात ‘स्पेशल शतक’
नागपूरच्या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने मैदानात पाऊल ठेवताच एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सामने खेळणारा सूर्या हा भारत चौथा खेळाडू ठरला आहे. या कामगिरीसह तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे, सूर्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (९८ सामने) याला आधीच मागे टाकले आहे.

भारताचे टी-२०त ४४ व्यांदा ‘द्विशतक’
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी पुन्हा एकदा मैदानात धावांचा पाऊस पाडत इतिहास रचला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० हून अधिक धावांची धावसंख्या उभारण्याचा ४४ वा विक्रम भारताने आपल्या नावावर केला आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा २०० धावांचा आकडा गाठणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे.     

अभिषेक शर्माचा जागतिक विक्रम

अभिषेक शर्मा आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक अर्धशतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने बुधवारी आठव्यांदा ही किमया साधली. या शर्यतीत त्याने इंग्लंडच्या फिल साॅल्टला (७ वेळा) मागे टाकले आहे.

२५ पेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक अर्धशतके (टी-२०) :
अभिषेक शर्मा : ८ वेळा
फिल साल्ट : ७ वेळा
सूर्यकुमार यादव : ७ वेळा
एविन लुईस : ७ वेळा

नागपुरात पाडला षटकारांचा पाऊस
अभिषेकने या सामन्यात केवळ ३५ चेंडूत ८४ धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकार ठोकले. न्यूझीलंडविरुद्धच्या एका टी-२० डावात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने किरॉन पोलार्डची बरोबरी केली आहे. ८४ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर आणखी एक षटकार खेचण्याच्या नादात तो बाद झाला, मात्र तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले होते.



रिंकूने मिचेलची काढली पिसं

ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो ‘रिंकू सिंह शो’ नागपुरात पाहायला मिळाला. डावाच्या शेवटच्या षटकात रिंकू सिंहने न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू डॅरिल मिचेलला लक्ष्य करत धावांचा पाऊस पाडला आणि भारताला ७ बाद २३८ या मजबूत धावसंख्येवर पोहोचवले. रिंकूने केवळ २० चेंडूत ४४ धावा कुटल्या (४ चौकार, ३ षटकार). त्याच्या या फटकेबाजीमुळे भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २३९ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.

* शेवटच्या षटकाचा थरार : ६, ६, ०, wd, ४, ०, ४

संक्षिप्त धावफलक 

भारत : २० षटकांत ७ बाद २३८ धावा

न्यूझीलंड : २० षटकांत ७ बाद १९० धावा

सामनावीर : अभिषेक शर्मा