उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याच्या भुवनेश्वरी जाधवने कलारीपयट्टू स्पर्धेत कैपोरू श्रेणीत (६० किलोपेक्षा जास्त मुलींच्या विभागात) सुवर्णपदक पटकावले.
भुवनेश्वरीने गोवा विरुद्ध राजस्थान सामन्यात १७-६, गोवा विरुद्ध हरियाणा सामन्यात १४-५, गोवा विरुद्ध दिल्ली सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. तर दिल्लीने रौप्य आणि हरियाणाने कांस्यपदक जिंकले.गोवा कलारीपयट्टू पथकाचे नेतृत्व गोवा सचिव दीपक आमोणकर यांनी गोवा प्रशिक्षक सुदर्शन संपत यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या कार्यक्रमाचे पर्यवेक्षण तांत्रिक अधिकारी रंजन मुल्लारट्ट यांनी केले.