चौथ्या टी २० सामन्यात इंग्लंडचा १५ धावा, २ चेंडू राखून विजय
पुणे : इंग्लंडविरूद्ध चौथ्या टी-२० सामन्यात १५ धावांनी आणि ३ चेंडू राखून विजय मिळवत भारतीय संघाने ३-१ च्या फरकाने मालिका विजय मिळवला. भारताचे गोलंदाज आणि शिवम दुबे-हार्दिक पंड्याने इंग्लंडकडून हा सामना हिसकावून घेतला. भारताने इंग्लंडला १८२ धावांचे आव्हान दिले होते. पण संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला.
नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड संघाने भारताला प्रथम फलंदाजासाठी पाचारण केले. भारताच्या सलामीच्या जोडीने पहिल्याच षटकात १२ धावा करत दणक्यात सुरूवात केली. पण दुसऱ्या षटकात भारताला एक नव्हे तीन धक्के बसले. संजू सॅमसन आणि तिलक वर्मा पहिल्या दोन चेंडूवर झेलबाद झाले. तर तिसऱ्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. साकिब महमूदने एका षटकात ३ विकेट घेत एकही धाव दिली नाही. भारताची स्थिती दुसऱ्या षटकानंतर १२-३ अशी होती. पण यानंतर रिंकू सिंगने ३० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला.रिंकू सिंग बाद झाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा अडचणीत आली. पण भारताचे दोन अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी ८७ धावांची विक्रमी भागीदारी रचत भारताला १८१ धावांची महत्त्वपूर्ण धावसंख्या उभारण्यात मदत केली. इतकंच नाही तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांनी शानदार अर्धशतक झळकावली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मध्ये हार्दिक पांड्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५३ धावांची खेळी खेळली. तर शिवम दुबेने ७ चौकार आणि २ षटकारांसह ३४ चेंडूत ५३ धावा केल्या.
हर्षित राणाचे टी-२० मध्ये पदार्पण
पहिल्या डावात अर्धशतक झळकावल्यानंतर फलंदाजी करताना शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला. दरम्यान त्याच्या जागी हर्षित राणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये कनक्शन पर्याय म्हणून स्थान मिळाले. हर्षित नियमानुसार गोलंदाजी करू शकतो. दोन्ही डावांमधील ब्रेकनंतर शिवम दुबे पुन्हा मैदानावर उतरला नाही. त्याच्या जागी पर्यायी खेळाडू म्हणून रमणदीप सिंग मैदानावर उतरला. पण याबाबत पंच आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चर्चा सुरू झाली. यानंतर हर्षित राणा मैदानात उतरला. ज्याने आधी रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर जोस बटलरला झेलबाद केले. दुसऱ्याच चेंडूवर त्याने विकेट घेतली. लियाम लिव्हिंगस्टोनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
कनक्शन पर्याय म्हणून हर्षित राणा संघात
कनक्शन पर्यायाबाबत नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूला सामन्यादरम्यान डोक्याला दुखापत झाली, तर त्याच्या जागी इतर कोणत्याही खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र, पर्यायी खेळाडू सारखाच असणे गरजेचे असते. म्हणजे फलंदाजाच्या जागी गोलंदाजाचा समावेश करता येत नाही. वेगवान गोलंदाजाच्या जागी फिरकीपटूचा समावेश केला जाऊ शकत नाही. शिवम दुबे आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. अशा स्थितीत भारताला गोलंदाजीत आणखी एक पर्याय मिळाला आणि भारताला त्याचा फायदा झाला.