प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात मंगळवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १७ भाविक ठार

एका अफवेमुळे सुरू झाला गोंधळ. आज पहाटेपासून येथील स्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश. सकाळी १० वाजल्यापासून अमृतस्नानास पुन्हा सुरुवात होईल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29th January, 09:56 am
प्रयागराज : महाकुंभ मेळ्यात मंगळवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १७ भाविक ठार

प्रयागराज : प्रयागराज येथील महाकुंभाच्या दुसऱ्या अमृत स्नान उत्सव मौनी अमावस्येला संगमावर चेंगराचेंगरी झाली यात अनेक जण जखमी झाले तर १७ भाविकांवर मृत्यू ओढवला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटना घडल्याच्या   अवघ्या काही वेळातच प्रशासनाने जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला. दुसऱ्या अमृत स्नान उत्सव मौनी अमावस्येचे औचित्य साधत संगमावर स्नान करण्यासाठी भाविक जमले होते. गर्दी अचानक वाढली व रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संगमकिनारी ही  भीषण दुर्घटना उद्भवली. संपूर्ण प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, पहाटेपासून स्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.  



मंगळवार-बुधवारी रात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर चेंगराचेंगरी झाली.  ५०  हून अधिक जखमी आहेत तर १७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एका अफवेमुळे संगमावर चेंगराचेंगरी झाली. काही महिला जमिनीवर पडल्या आणि लोक त्यांना तुडवत पुढे गेले. दुर्घटनेनंतर ७० हून अधिक रुग्णवाहिका संगम किनारी पोहोचल्या. जखमी आणि मृतांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


अपघातानंतर बऱ्याच वेळाने 70 हून अधिक रुग्णवाहिका संगमवर पोहोचल्या.


चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाच्या विनंतीवरून सर्व १३ आखाड्यांनी आज मौनी अमावस्येचे अमृतस्नान रद्द केले होते. यानंतर पहाटे सुमारे ४ ते ५ दरम्यान आखाड्यांची बैठक झाली. सकाळी १० वाजल्यानंतर अमृत स्नान करायचे ठरले. पंतप्रधान  मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  यांच्याकडून फोनवरून घटनेची माहिती घेतली. तर पहाटे पासून योगी आदित्यनाथ यांनी बैठकांचा धडाका लावला आहे.  पालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि रुग्णालयांच्या प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू आहे. आता अधिकारी हेलिकॉप्टरमधून महाकुंभावर लक्ष ठेवून आहेत.


Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 10 जणांचा मृत्यू ; अनेक जण  जखमी, अमृतस्नान रद्द


दुर्घटनेनंतर एनएसजी कमांडोंनी संगम तीरावर येत मोर्चा सांभाळला. संगमावर सर्वसामान्यांचा प्रवेश बंद करण्यात आला. गर्दी आणखी वाढू नये म्हणून प्रयागराज शहरातही भाविकांच्या येण्यावर बंदी घालण्यात आली. यासाठी शहराला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त भाविक जखमी, अमृत  स्नान रद्द – News18 मराठी


आज महाकुंभात मौनी अमावस्येला स्नान असून, त्यानिमित्त शहरात सुमारे ५ कोटी भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. रात्री उशिरापर्यंत संगमसह ४४ घाटांवर ८ ते १० कोटी भाविक स्नान करतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी पहाटेपासून साडेपाच कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. संपूर्ण शहरात मोक्याच्या ठिकाणी ६० हजारांहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात आहेत. तीर्थराज प्रयागराजमध्ये सोमवार १३ जानेवारीपासून पौष पौर्णिमेपासून 'पूर्ण महाकुंभाचा प्रारंभ झाला. महाकुंभाच्या या मेळाव्यात लोक ब्रह्म मुहूर्तापासून त्रिवेणी संगमात (गंगा, यमुना आणि सरस्वती) श्रद्धेने स्नान करत आहेत. स्नानासोबतच 'हर हर महादेव' आणि 'हर हर गंगे'चा जयघोष सर्वत्र गुंजत आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. मात्र या दुर्घटनेमुळे काही प्रमाणात महाकुंभाला गालबोट लागले आहे. 


AI in Maha Kumbh 2025: जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यात चेंगराचेंगरी  रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत, सुरक्षेची हमी

हेही वाचा