कर्नाटकात उद्योजक, व्यावसायिकांच्या घरांवर गोवा आयकर विभागाची छापेमारी

व्यावसायिकांमध्ये खळबळ; बेहिशेबी मालमत्ता, कागदपत्रांची तपासणी सुरु

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
28th January, 02:09 pm
कर्नाटकात उद्योजक, व्यावसायिकांच्या घरांवर गोवा आयकर विभागाची छापेमारी

बेळगाव : मंगळवारी पहाटेपासून बेळगावमधील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर गोव्यातील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. 

एकूण पाच टीम या कारवाईमध्ये सामील असून एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे. बेहिशेबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचे बोलले जात आहे. उद्योजकांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकून बेहिशेबी मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

बेळगाव कॅम्प आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बेळगावसह बंगळुरू आणि धारवाड येथेही आयकर विभागाच्या पथकाने दिग्गज उद्योजकांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत.

हेही वाचा