बजेट २०२५: काय होणार स्वस्त? काय महागणार...

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
28th January, 12:28 pm
बजेट २०२५: काय होणार स्वस्त? काय महागणार...

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी वित्त वर्ष २०२५-२६ साठी बजेट सादर करणार आहेत. मध्यम वर्गासाठी मोदी सरकारच्या या बजेटवर खूप आशा असून त्यांची या बजेटवर विशेष नजर असणार आहे. या बजेटमध्ये महागाई आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष देण्यात येईल, अशी देशातील सामान्य नागरिकांना अपेक्षा आहे.

केंद्र सरकारने सन २०४७ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा संरक्षण देण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात आरोग्य विमा क्षेत्रात मोठे बदल करण्याची घोषणा केली जाऊ शकते. या बदलाच्या माध्यमातून जीवन विम्यालाही प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या मुद्द्यांवर घोषणा होण्याची शक्यताः
अर्थसंकल्पात यावेळी सरकार रेल्वे, हवाई वाहतूक, आरोग्यसेवा, हॉस्पिटॅलिटी, डेटा सेंटर आणि मॅन्युफॅक्चरिंग सारख्या क्षेत्रांसाठी घोषणा करण्याची शक्यता आहे. सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देऊ शकते. अर्थसंकल्पात मोबाईल फोन व्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीतही घट होऊ शकते.

मोदी सरकारच्या तिसर्‍या टप्प्यातील पहिले बजेटः

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प मांडतील. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात असेल. मोदी सरकारच्या तिसर्‍या टप्प्यातील हे पहिले बजेट आहे. 

हे अधिवेशन ४ एप्रिलपर्यंत असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग आठवे बजेट सादर करतील. त्यात ६ पूर्ण अर्थसंकल्प तर दोन निवडणूक काळातील अंतरिम बजेट यांचा समावेश असेल.

हेही वाचा