आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
सोलापूर : गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे महाराष्ट्रात पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सोलापुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) मुळे झाल्याचा अंदाज आरोग्य विभागाने जारी केला आहे. त्याचवेळी राज्यात जीबीएस बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून एकट्या पुण्यात १०० हून अधिक रुग्ण आहेत. मृत हा सोलापूरचा रहिवासी असून, काही काळापूर्वी तो पुण्याला आला होता. पुण्यातच त्याला जीबीएस सिंड्रोमची लागण झाल्याचे समजते. मात्र, या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप फारशी माहिती दिलेली नाही. एकंदरीत प्रकारामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टमोडवर आली आहे.
इम्युनोलॉजिकल नर्व्ह डिसऑर्डर गिलियन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक व प्रभाव पुण्यात सर्वाधिक दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या बुलेटीननुसार, काल रविवारपर्यंत जीबीएस ग्रासीत रुग्णांची संख्या ही १०० पार गेली होती. रुग्णांमध्ये ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत. यापैकी १६ रुग्णांची संख्या चिंताग्रस्त असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. रॅपिड रिस्पॉन्स टीम आणि पुणे महापालिकेचे आरोग्य विभाग सातत्याने पाळत ठेवत आहेत. विशेषत: पुण्यातील सिंहगड रोडवर विशेष लक्ष ठेवले जात आहे कारण तेथे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यातील २५,५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी १५,७६१ घरे पुणे महापालिकेच्या अंतर्गत येतात आणि ३७१९ घरे चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत येतात. तर ६०९८ घरे ग्रामीण भागात आहेत.
Guillain Barre Syndrome किंवा GBS म्हणजे काय ?
ही एक इम्युनोलॉजिकल नर्व्ह डिसऑर्डर आहे. या आजारात हात-पाय अचानक सुन्न होऊन स्नायू कमकुवत होतात. या आजाराच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, अतिसार इ. समावेश आहे. ही समस्या सामान्यतः जिवाणू आणि विषाणूजन्य संसर्गामुळे उद्भवते. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. लहान मुले आणि तरुण या आजाराने अधिक प्रभावित होत आहेत. मात्र, चांगली बाब म्हणजे रुग्ण उपचारानंतर बरेही होत आहेत. सरकारने लोकांना पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवा आणि ते उकळल्यानंतर वापरण्याचा सल्ला दिला आहे. लोकांना त्यांच्या जेवणात स्वच्छता राखण्याचा आणि भाज्या पूर्णपणे उकळून खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.