पेडणे : केरी येथील पॅराग्लायडिंग दुर्घटनेप्रकरणी मालकावर गुन्हा नोंद

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
पेडणे : केरी येथील पॅराग्लायडिंग दुर्घटनेप्रकरणी मालकावर गुन्हा नोंद

म्हापसा : केरी-पेडणे येथे झालेल्या पॅराग्लायडिंग दुर्घटने प्रकरणी 'हायक अँड फ्लाय' या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायझादा (मूळ उत्तरप्रदेश) यांच्याविरुद्ध मांद्रे पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या अपघातात पुण्यातील शिवानी दाभाळे (वय २७) या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग पायलट सुमन नेपाली (वय २६) हे दोघे ठार झाले होते.



तपासादरम्यान 'हायक अँड फ्लाय' या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायझादा (मूळ उत्तरप्रदेश) पर्यटन खाते व संबंधित विभागांकडून पॅराग्लायडिंग सारख्या साहसी खेळांचे संचालन करण्यासाठी आवश्यक ती परवानगी न घेताच आयोजन करत होते असे आढळून आले आहे. तसेच अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोती पॅराग्लायडिंगसाठी आवश्यक असलेल्या सुरक्षा उपायांकडे सपशेल दुर्लक्ष करत पर्यटकाचा जीव धोक्यात घातल्याचे देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे पायलटकडे पॅराग्लायडिंगसाठी लागणारा परवाना देखील नव्हता. या प्रकरणी मांद्रे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक परेश काळे यांनी योग्य कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. 


Enjoy Paragliding in Goa at Keri Beach


सदर दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुमन नेपाळी आणि पर्यटक शिवानी दाभाळे हे दोघेही पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटल्यानंतर थेट डोंगरावर पडून यात या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी ४.३०च्या सुमारास घडली. शवचिकित्सेसाठी दोन्ही मृतदेह बांबोळी इस्पितळात पाठवण्यात आले आहेत. शिवानी दाभाळे ही तरुणी पुण्यातील खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. आपल्या एका मित्रा सोबत ती गोव्यात पर्यटनासाठी आली होती. पुढील तपास सुरू आहे. 


Paragliding in Goa 2024: Places, Cost, Operators

बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा