२०२२, २०२३, २०२४चे पुरस्कार अकादमीच्या बैठकीत शिक्कामोर्तब
पणजी: गोवा कोकणी अकादमीने त्यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीत २०२२, २०२३ आणि २०२४ या तीन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. २०२४ सालासाठी कोकणी माध्यमातील कला कौशल्य पुरस्कार प्रुडंट मीडिया नेटवर्कचे संचालक संपादक प्रमोद आचार्य यांना, तर दै. भांगरभूंयचे उपसंपादक अतुल पंडित यांना
२०२३ सालासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे :
२०२२ कोकणी साहित्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट कोकणी साहित्य/पुस्तक पुरस्कार : कविता - रमेश घाडी, नाट्य लेखन- सम्राट बोरकर, निबंध - विजया शेळडेंकर, संशोधन/शास्त्रीय - विनायक खेडेकर, बालसाहित्य- नयना आडारकर, अनुवाद- सखाराम बोरकर, गोव्याबाहेरच्या कोकणी लेखकाला साहित्य पुरस्कार- वेंकटेश नाईक.
कोकणी भाषा सेवा पुरस्कार : साहित्य : प्रतिभा पुरस्कार : अशाेक कामत. साहित्य प्रज्ञा पुरस्कार : : सुरेश पै.
युवा चैतन्य पुरस्कार (एकूण २) : अक्षय नायक आणि संपदा कुंकळकर. कोकणी माध्यमातील कला कौशल्य पुरस्कार : भिकू बोमी नायक.
शेणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार : इजिदोर दांतास.
कोकणी भाषा सेवा पुरस्कार : आर.एस. भास्कर.
कोकणी कला सेवा पुरस्कार : : रामानंद रायकर. कोकणी सेवा संस्था पुरस्कार : कला मोगी, कांदोळी.
२०२३ कोकणी साहित्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट कोकणी साहित्य/पुस्तक पुरस्कार : कविता : संजय बोरकर, कथा /कादंबरी : विशाल खांडेपारकर, नाट्यलेखन : दिलीप धारगळकर, निबंध : शैलेंद्र मेहता, संशोधन/शास्त्रीय : मार्कस गोन्साल्विस, बालसाहित्य : विल्यम फर्नांडिस, अनुवाद : भूषण भावे, गोव्याबाहेरील कोकणी लेखकासाठी साहित्य पुरस्कार : एच. एम. पेर्नाल, कोकणी भाषा सेवा पुरस्कार : साहित्य प्रतिभा पुरस्कार : एन. शिवदास. साहित्य प्रज्ञा पुरस्कार : डॉ. किरण बुडकुले. युवा चैतन्य पुरस्कार (एकूण २) : दत्तराज (दत्तू) नायक, नरेश नाईक.
कोकणी माध्यमातील कला कौशल्य पुरस्कार : अतुल पंडित. शेणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार : प्रकाश दत्ताराम नायक. माधव मंजुनाथ शानभाग कोकणी भाषा सेवा पुरस्कार : मेल्विन रॉड्रिग्ज. कोकणी कला सेवा पुरस्कार : ज्योती कुंकळकर. कोकणी सेवा संस्था पुरस्कार : शेणै गोंयबाब सेवा केंद्र, कुडचडे.
२०२४ कोंकणी साहित्य पुरस्कार : सर्वोत्कृष्ट कोकणी साहित्य/पुस्तक पुरस्कार : कविता - धर्मनिंद वेर्णेकर, कथा/कादंबरी - वसंत सैल, नाट्यलेखन- सुरंगा मडकईकर, निबंध- अनंत अग्नी, संशोधन/शास्त्रीय - कोझ्मा फर्नांडिस, समीक्षा- प्रकाश वजीकर, बालसाहित्य- अभयकुमार वेलिंगकर, अनुवाद- सुरेश काकोडकर. गोव्याबाहेरील कोकणी लेखकासाठी साहित्य पुरस्कार : अंजली किणी. कोकणी भाषा सेवा पुरस्कार : साहित्य प्रतिभा पुरस्कार : तुकाराम शेट.
प्रमोद आचार्य यांना कला कौशल्य पुरस्कार
२०२४ सालासाठी कोकणी माध्यमातील कला कौशल्य पुरस्कार : प्रमोद आचार्य. साहित्य प्रज्ञा पुरस्कार - सतीश दळवी, युवा चैतन्य पुरस्कार (एकूण २) : नंदन कुंकळकर, विनय गावस. शेणै गोंयबाब कोकणी भाषा सेवा पुरस्कार : विनायक गोवेकर. माधव मंजुनाथ शानभाग कोकणी भाषा सेवा पुरस्कार : देविदास पै. कोकणी कला सेवा पुरस्कार : अॅड. जुवांव फर्नांडिस. कोकणी सेवा संस्था पुरस्कार : ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था, सत्तरी.