रसरंग, उगवे-पेडणेचे ‘वुमन’ द्वितीय, वास्कोचे ‘लिअरने जगावं की मरावं’ नाटक तृतीय
पणजी : कला अकादमीने आयोजित केलेल्या ५७ व्या 'अ' गट मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत रुद्रेश्वर पणजीच्या ‘मीडिआ’ या नाटकाला १ लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. रसरंग, उगवे-पेडणेच्या ‘वुमन’ला ७५ हजार रुपयांचे द्वितीय आणि श्री शांतादुर्गा कला आणि क्रीडा संघ वास्कोच्या ‘लिअर ने जगावं की मरावं?’ या नाटकाची ५० हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड केली आहे. सदर स्पर्धा मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिर, पणजी येथे घेण्यात आली.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ पारितोषिक २५ हजार रु. ‘बर्फाग्नी’ (अभय थिएटर अकादमी, पाळी, सुर्ला-डिचोली) आणि ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ (श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज बांदिवडे-फोंडा) या नाटकांना देण्यात आले.
उत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचे प्रथम पारितोषिक १० हजार गंगाराम नार्वेकर (सतिश) मीडिआ-रुद्रेश्वर, द्वितीय ७ हजार नीलेश महाले (वुमन-रसरंग), तृतीय ५ हजार वैभव नाईक (लिअर ने जगावं की मरावं?-श्री शांतादुर्गा, वास्को) यांना देण्यात आले.
वैयक्तिक अभिनयासाठीचे (पुरुष) प्रथम ७ हजार रु. सौरभ कारखानीस (विप्लव मुजुमदार-लिअर ने जगांव की मरावं?), द्वितीय ५ हजार रु. मिलिंद बर्वे (गुलाम रसुल-बर्फाग्नी) यांना मिळाले. तसेच अभिनयासाठीची प्रमाणपत्रके वरेश फडके (ढब्बुशास्त्री-किरवंत), रोहिदास राऊत (सिद्धेश्वर शास्त्री जोशी-किरवंत), अविनाश नाईक (भिरु-मरणप्राय), संघर्ष वळवईकर (पिरु-मरणप्राय), संजीव प्रभु (सत्यव्रत-ब्राम्हणकन्या), साईनंद वळवईकर (असीम भानु-लिअर ने जगावं की मरावं?), व्यंकटेश गावणेकर (प्रभाकर-का?), अंकुश पेडणेकर (होडरर-रंगेहात), अथर्व प्रमोद जोशी (सूरज-आकंद), अविनाश राऊत (मधू-किरवंत) यांना देण्यात आले.
वैयक्तिक अभिनयासाठीचे (स्त्री) प्रथम ७ हजार रु. वैष्णवी पै काकोडे (मीडिआ-मीडिआ), द्वितीय ५ हजार रु. डॉ. वेदिका वाळके (स्त्री २-वुमन) यांना जाहीर करण्यात आले. स्त्री गटातील अभिनयासाठीची प्रमाणपत्रके डॉ. संस्कृती रायकर (आशा-असावा सुंदर चॉकलेटचा बंगला), ममता शिरोडकर (निशा-असावा सुंदर चॉकलेटचा बंगला), प्रांजल मराठे (रेवती-किरवंत), श्रेयस करमली कामत (एस्तर-ब्राम्हणकन्या), सोबीता कुडतरकर (अरुंधती शर्मा-लिअर ने जगावं की मरावं?), सुविधा बखले (स्त्री-वुमन), माधुरी शेटकर (जेसिका-रंगेहात), दिव्या बर्वे (रेवा-आक्रंद), मनुजा नार्वेकर लोकुर (दासी-मीडिआ), अर्चना डिचोलकर (नफिसा-बर्फाग्नी) यांना देण्यात आले.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीचे प्रथम रु. ५ हजार योगेश कापडी (मीडिआ-रुद्रेश्वर), तर प्रमाणपत्र- जयप्रकाश निर्मले (वुमन-रसरंग), उत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम रु. ५ हजार गंगाराम नार्वेकर (सतिश-मीडिआ-रसरंग) तर प्रमाणपत्र- वैभव नाईक (लिअर ने जगावं की मरावं?-श्री शांतादुर्गा, वास्को) यांना देण्यात आले.
उत्कृष्ट वेशभूषेसाठी प्रथम रु. ५ हजार श्वेता नार्वेकर (मीडिआ-रुद्रेश्वर), तर प्रमाणपत्र- दीपलक्ष्मी मोघे (रंगेहात-इंद्रेश्वर यूथ क्लब गावडोंगरी-काणकोण). ध्वनिसंकलन/पार्श्वसंगीत- प्रथम रु. ५ हजार सिंधुराज कामत (वुमन-रसरंग), प्रमाणपत्र योगेश कापडी (मीडिआ-रुद्रेश्वर). रंगभूषा- प्रथम रु. ५ हजार एकनाथ नाईक (मीडिआ-रुद्रेश्वर), प्रमाणपत्र अमिता नाईक (वुमन-रसरंग). नाट्यलेखन- प्रथम रु. १० हजार डॉ. स्मिता जांभळे (का?-अथश्री, फोंडा), द्वितीय रु. ७ हजार संजीव बर्वे (आकंद-विकास मंच, वाळपई) यांना देण्यात आले.
खास स्पर्धेसाठी अनुवादित रुपांतरित केलेल्या संहितेसाठी रु. १० हजार कौस्तुभ नाईक (ब्राम्हणकन्या) गोमंत विद्या निकेतन, मडगाव यांना देण्यात आले. या नाट्यस्पर्धेचे परीक्षण विष्णु केतकर, रमेश भोळे आणि रवींद्र कुलकर्णी यांनी केले. पारितोषिकप्राप्त कलाकारांचे कला अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.