हावेरी, कारवार येथे ५० लीटर दारूसह ३९ लाखांची दोन वाहने जप्त

कर्नाटक अबकारी विभागाची दोन ठिकाणी कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th January, 04:22 pm
हावेरी, कारवार येथे ५० लीटर दारूसह ३९ लाखांची दोन वाहने जप्त
कारवार : कर्नाटक अबकारी विभागाने हावेरी आणि कारवार येथे दोन वाहनावर कारवाई करून सुमारे ५० लिटर गोव्याची दारूसह ३९ लाख रुपये किंमतीची दोन वाहने जप्त केली आहेत. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. कर्नाटक अबकारी कायद्यानुसार गोव्यातील दारू कर्नाटकात आणण्याची बंदी असतानाही त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.

हावेरी येथे फोर्स मोटर्स कंपनीच्या  (केए ०२ एके ७९०३) ट्रॅव्हल्स वाहनाची तपासणी केली असता ३१  लीटर दारू सापडली. या प्रकरणी वाहन चालकासह तिघांना अबकारी विभागाने अटक केली. तर दारु वाहतुकीसाठी वापरलेली १९ लाखांची ट्रॅव्हल्स गाडीही जप्त करण्यात आली आहे.


दुसऱ्या घटनेत कारवार येथील बोगद्याजवळ क्रिस्टा वाहनाची  अबकारी विभागाने तपासणी केली असता त्या वाहनात १९ लीटर दारू सापडली. या प्रकरणी अशोक राजय्या (रा. हासन ) याला अटक केली असून २० लाख रुपये किंमतीची इन्होवाही जप्त करण्यात आली आहे.
हेही वाचा