साहित्य
बटर
४ बारीक चिरलेले कांदे
२ बारीक चिरलेले टोमॅटो
१ चमचा आलं लसूण पेस्ट
२ मोठे चमचा पाव भाजी मसाला
लाल तिखट
२ बारीक चिरलेली ढोबळी मिरची
१ मोठा चिरलेला फ्लॉवर
१ मोठी वाटी मटार
४ ते ५ मध्यम चिरलेले व साल काढलेले बटाटे
१ मध्यम चिरलेला बीट
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
पाव
कृती
प्रथम एका कुकरच्या भांड्यात सर्व भाज्या घ्या. (२ बारीक चिरलेल्या ढोबळ्या मिरच्या, १ मोठा चिरलेला फ्लॉवर, १ मोठी वाटी मटार, ४ ते ५ मध्यम चिरलेले साल काढलेले बटाटे, १ मध्यम चिरलेला बीट. तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता.) यात पाणी घाला व ४ ते ५ शिट्या कुकरमध्ये काढून घ्या. या भाज्या थंड झाल्या की एकजीव करून घ्या. आता एका कढईत ३ ते ४ चमचे बटर घ्या. यात बारीक चिरलेले कांदे घाला. कांद्याला सोनेरी रंग आला की त्यात २ बारीक चिरलेले टोमॅटो घाला. टोमॅटो मऊ झाले की त्यात १ चमचा आलं लसूण पेस्ट घाला व १ मिनट परतून घ्या. मग यात पाव भाजी मसाला, लाल तिखट घाला व २ ते ३ मिनिटं परतून घ्या. आता यात सगळ्या भाज्या घाला. मंद गॅसवर उकळी काढा. आता यात चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घाला. एकत्र करा. एका तव्यावर १ चमचा बटर घाला व पाव छान भाजून घ्या. अश्या प्रकारे चमचमीत पाव भाजी तयार आहे.
संचिता केळकर