पर्यटनमंत्री रोहन खंवटे; वॉटरस्पोर्ट् स, क्रुझ जहाज मालकांसोबत बैठक
पणजी : यूट्यूब आणि इतर सोशल माध्यमांद्वारे राज्यातील पर्यटनाबाबत चुकीची व खोटी माहिती पसरवली जात आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लूएंसर पैसे घेऊन ही चुकीची माहिती पसरवतात. अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवणाऱ्या किंवा बदनामी करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी एक आराखडा तयार केला जाईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी मी याबाबत चर्चा केली आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी मंत्रालयात वॉटरस्पोर्ट् स, क्रुज बोट मालकांसोबत बैठक घेतली. समुद्र किनाऱ्यांवर मोकाट कुत्र्यांचा व भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत त्यांनी पोलीस व पशू संवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेतली.
नवीन वर्षासाठी गोव्यापेक्षा इतर ठिकाणांना अधिक पसंती दिली जात आहे. गोव्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. अशा बातम्या आणि पोस्ट सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. रस्ते मोकळे असल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. या सर्व घटनांवर सरकार लक्ष ठेवून आहे. पर्यटनावर कोणताही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नववर्षाला अधिक पर्यटकांनी भेट दिली. पंचतारांकितांसह सर्व हॉटेल्स फुल्ल झाली होती. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. त्यामुळे हॉटेल्ससह अन्य व्यवसायांना चांगला फायदा झाला, असे मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
भटकी कुत्री हटवण्यासाठी विशेष मोहीम