भाजप मंडळ अध्यक्षांची निवड सुरू; आज होणार उर्वरीत निवड
पणजी : मंडळ अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मंडळाच्या अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी हजेरी लावली असून नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांशी चर्चा सुरू केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मंडळ अध्यक्षांची निवडणूक शनिवारी सुरू झाली असून उर्वरीत रविवारी होत आहे. शनिवारी मुरगाव, फातोर्डा व दाबोळी मतदारसंघांतील अध्यक्षांची निवड झाली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी चंद्रकांत कवळेकर, दामू नाईक, अॅड. नरेंद्र सावईकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर आणि दयानंद सोपटे यांची नावे पक्षाने दिल्लीला पाठवली आहेत. या सर्व इच्छुकांनी आपापल्या पद्धतीने अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.