क्रमवारीत गोवा देशात प्रथम; यादीत केरळ दुसऱ्या क्रमांकावर
पणजी : राज्यातील विविध शाळांच्या वाचनालय तसेच बुक बँकेत ५० लाख ३ हजार १८४ पुस्तके आहेत. राज्यात एकूण १४८७ शाळा आहेत. प्रत्येक शाळेत सरासरी ३३६४ पुस्तके उपलब्ध आहेत. सरासरी पुस्तके अधिक असण्याच्या राज्यांच्या क्रमवारीत गोवा देशात प्रथम स्थानी आहे. केंद्रीय शिक्षण खात्याच्या ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस’ (युडीआयएसई) २०२३-२४ च्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
या यादीत २७८३ पुस्तकांसह केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर हरियाणा (२१९८), कर्नाटक (१६१२), पंजाब (१६५४), ओडिशा (१२३१), गुजरात (११९८), महाराष्ट्र (११६४) या राज्यांचा क्रमांक लागतो.