३,१५५ने कमी होऊन खातेधारकांची संख्या ४४ हजारांवर
पणजी : राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा नवीन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ ) खाती काढण्याचे प्रमाण घटले आहे. एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान राज्यात एकूण ४७ हजार ३४६ नवी ईपीएफओ खाती काढण्यात आली होती. तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान राज्यातील नवी खात्यांची संख्या ३,१५५ ने कमी होऊन ती ४४ हजार १९१ इतकी झाली. केंद्रीय कामगार खात्याच्या ईपीएफओने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
राज्यात एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान काढण्यात आलेल्या ईपीएफ खात्यांपैकी सर्वाधिक १२ हजार ८५९ खाती (२९.०९ टक्के) ही १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांची होती. २२ ते २५ या वर्षे वयोगटातील तरुणांची १२ हजार २९२ (२७.८१ टक्के) ईपीएफ खाती उघडण्यात आली होती. याशिवाय २६ ते २८ वयोगटातील व्यक्तींची ५८२२ (१३.१७ टक्के), २९ ते ३५ वर्षे वयोगटातल्या व्यक्तींची ७१५६ (१६.१९ टक्के) तर ३५ हून अधिक वय असणाऱ्या ५६४२ (१२.७६ टक्के) लोकांची ईपीएफओ खाती उघडण्यात आली होती.