साहित्य :
२ चमचे तेल
२ बारीक चिरलेले कांदे
१ टोमॅटो बारीक चिरलेला
१ चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा धने पूड
१ चमचा गरम मसाला
लाल तिखट
१ चमचा बेसन
चवीनुसार मीठ
१ ढोबळी मिरची
२०० ग्रॅम किसलेला पनीर
बटर
कोथिंबीर
कृती :
प्रथम एका भांड्यात २ चमचे तेल तापत ठेवा. यात २ बारीक चिरलेले कांदे घाला व कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. मग यात १ बारीक चिरलेला टोमॅटो घाला व ५ ते ६ मिनटे परतून घ्या. आता यात १ चमचा आलं लसूण पेस्ट, १ चमचा धने पूड, १ चमचा गरम मसाला, तिखट घाला व छान एकत्र करा. मग हे पूर्ण मिश्रण भांड्याच्या एका बाजूला करा आणि त्यात १ चमचा बेसन घाला. बेसनला सोनेरी रंग आला की हे मिश्रण एकत्र करा आणि यात तुम्हाला पाहिजे त्या नुसार पाणी घाला. एक उकळी काढा. चवीनुसार मीठ घाला. एकत्र करा आणि यात १ ढोबळी मिरची व किसलेला २०० ग्रॅम पनीर घाला. हे सर्व या मसाल्यात एकत्र करा. कोथिंबीर व बटर घाला. तर अशा प्रकारे चमचमीत पनीर भाजी / पनीर घोटाळे खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी पाव, चपाती, भाकरीबरोबर खाऊ शकता.
संचिता केळकर