जगात अनेक देशांमध्ये मुस्लीम समुदाय आहे. ज्या ठिकाणी मुस्लीम समुदाय आहे, त्या ठिकाणी मशीद आहे. परंतु, मुस्लीम आणि ख्रिश्चन लोक असतानाही भारताच्या शेजारी असणाऱ्या भूतान या अनोख्या देशात एकही मशीद नाही किंवा चर्च नाही. भूतानमध्ये मुस्लीम धर्मीय आणि अन्य धर्माचे लोकही मोठ्या प्रमाणात राहतात. मात्र, या देशात ना मशीद आहे ना चर्च. या देशात फक्त बौद्ध मंदिरे आणि मठ दिसून येतात. भूतान या अनोख्या देशात मशीद किंवा अन्य मंदिरे का नाहीत जाणून घेऊया.
भूतानमधील अनेक मुस्लीम बांधवांनी मशिदी बांधण्यासाठी मागणी मागितली. मात्र, त्याला सरकारकडून मान्यता मिळाली नाही. या देशाची लोकसंख्या जवळपास ७.५ लाख एवढी आहे. येथील ८४.३ टक्के लोकसंख्या बौद्ध धर्म पाळणारी आणि मानणारे आहेत. त्यामुळे येथे भरपूर बौद्ध मंदिरे आणि मठ आहे.
बौद्ध धर्मियांनंतर लोकसंख्येचा मोठा वर्ग हिंदू आहे. त्यांचीही काही मंदिरे आणि धर्मस्थळे येथे दिसून येतात. काही वर्षाआधी भूतानचा राजा राजधानी थिंफूने फार सुंदर अशा हिंदू मंदिराचे निर्माण केले आहे. भूतानमध्ये मुस्लीम धर्मियांची लोकसंख्या केवळ १ टक्के आहे. भूतानच्या लोकसंख्येचा आणि क्षेत्रफळाचा विचार करता हा देश भारतातील सगळ्यात छोटे राज्य गोवा याच्या पाच भागांतील एका भागाएवढे आहे. भारतात केरळ हे एक असे राज्य आहे जे ३८,८६३ चौरस किमी क्षेत्रफळात पसरलेले आहे. हे क्षेत्रफळ भूतान देशाएवढे आहे. मात्र, केरळ राज्याची लोकसंख्या ३.४६ कोटी एवढी म्हणजेच भूतान देशाच्या ४५० पटीने जास्त आहे.
भूतानमध्ये मुस्लीम बांधवांची संख्या जवळपास पाच ते सात लाखांच्या घरात आहे. हे बांधव येथे दीर्घकाळापासून राहात असले तरी त्यांची मशीद बांधण्याची मागणी त्यांनी स्वीकारलेली नाही. तसेच ख्रिश्चन बांधवही येथे बऱ्याच वर्षांपासून स्थायिक आहेत, पण तेथे चर्च नाही.
या देशात मशीद नसल्यामुळे भूतानचे लोक आपल्या घरी नमाज अदा करतात. मुस्लीम समुदायाने २००८ मध्ये भारताच्या सीमेत असणाऱ्या जयगाव येथे मशीद बांधली. त्या ठिकाणी विशेष कार्यक्रमादरम्यान मुस्लीम समाजाचे लोक एकत्र येतात आणि नमाज अदा करतात. भूतानमध्ये नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य आहे. परंतु, धर्मांतर करण्यास पूर्ण बंदी आहे. तसेच या देशात गैर बौद्ध धार्मिक इमारतींमध्ये सण साजरे करण्यास बंदी आहे. परंतु, हिंदू सण उत्साहात साजरे केले जातात. दसरा प्रमुख सण म्हणून साजरा होत असतो. त्या दिवशी भूतानमध्ये सार्वजनिक सुट्टी दिली जाते.
- सुदेश दळवी