सिनेवार्ता : संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण : अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची कोठडी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 05:22 pm
सिनेवार्ता : संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरण : अभिनेता अल्लू अर्जुनला १४ दिवसांची कोठडी

हैदराबाद : येथील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा 2: द राइज'च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर तेलंगणा पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली असून त्याला आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  अल्लू अर्जुन, त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध कलम भा. न्या. सं. च्या १०५ आणि कलम ११८ (१)  अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संध्या थिएटरचा मालक आणि दोन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.


संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. - दैनिक भास्कर


शुक्रवारी सकाळी तेलंगणा पोलीस अल्लू अर्जुनला अटक करण्यासाठी त्याच्या निवासस्थानी गेले होते. दरम्यान त्याला त्याच्या बेडरूममध्ये जात ताब्यात घेण्यात आले. आपल्या अटकेवर अल्लू अर्जुनने आक्षेप घेतला. वैद्यकीय तपासणीसाठी उस्मानिया रुग्णालयात नेण्यात आल्या नंतर चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात त्याचा जबाब नोंदवण्यात आला. 


पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी अल्लूने पत्नी स्नेहाला समजावून सांगितले.


अल्लू अर्जुन चित्रपटाच्या प्रीमियरला येत असल्याची माहिती थिएटर व्यवस्थापनाने पुष्पा-2 च्या प्रीमियरच्या दोन दिवस आधी पोलिसांना माहिती दिली होती आणि सुरक्षा व्यवस्थेची मागणी केली होती. असे असतानाही पोलिसांनी कोणतीही ठोस उपाययोजना पोलिसांनी केली नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे चित्रपटगृहाने कोणतीही माहिती दिली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


थिएटर व्यवस्थापनाने पोलिसांना पत्र जारी करून पुष्पा-२ च्या प्रीमियरला अल्लूच्या आगमनाची माहिती दिली.


आता या प्रकरणात पुढे काय होणार?

अल्लू अर्जुनने तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एफआयआरमधून आपले नाव वगळण्याची मागणी केली आहे. गर्दी नियंत्रण आणि सुरक्षा व्यवस्थापनातील निष्काळजीपणामुळे मोठ्या कार्यक्रमांमध्ये सुरक्षा उपायांची गरज या  प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील सुनावणीची प्रतीक्षा आहे.


Allu Arjun Requests Lunch Motion, Court Hearing Set for 2 PM Today


काय आहे प्रकरण : 

४ डिसेंबरला संध्या थिएटरमध्ये पुष्पा-२ चा प्रीमियर सुरू होता. अल्लू अर्जुन यावेळी संध्या थिएटरमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी आला होता. यामुळे चाहते अल्लू अर्जुनला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्याच्यासोबत मोठ्या संख्येने चाहत्यांनी थिएटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थिएटरमध्ये मोठी गर्दी जमली आणि त्यानंतर लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. गर्दी कमी झाल्यानंतर गुदमरल्यामुळे बेशुद्ध झालेल्या लोकांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यादरम्यान रुग्णालयात डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले होते.


हेही वाचा