दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश गुरुवारी विवाहबंधनात अडकली. तिने गोव्यात काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अँटनी थॅटिलसोबत लग्न केले.कीर्तीचा नवरा अँटनीचा दुबई आणि कोच्चीमध्ये व्यवसाय आहे. अँटनी नेहमी सोशल मीडियापासून दूर राहणे पसंत करतो. पण कीर्ती सुरेश मात्र सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या कीर्ती आणि अँटनी यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लग्नाच्या फोटोमध्ये कीर्ती आणि अँटनी यांचा साऊथ इंडियन ट्रॅडिशनल लूक दिसत आहे. दाक्षिणात्य पद्धतीनुसार या दोघांचे लग्न झाले आहे.
कीर्ती सुरेश आणि अँटनी थॅटिल हे दोघे एकमेकांना १५ वर्षांपासून डेट करत होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अँटनी थॅटिल एस्परोस विंडो सोल्यूशन्सचा मालक आहे. दुबईसोबतच तो बराच काळ कोच्चीमध्ये राहतो. तो उद्योगपती असला तरी त्याचे राहणीमान साधे आहे. त्याच्या मालकीचे अनेक रिसॉर्ट्स आहेत. किर्तीच्या शहरातही त्याने त्याचा उद्योग वाढवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अँटनीची नेटवर्थ ही ५ ते १० कोटी रुपयांच्या आसपास आहे. तरकीर्ती सुरेशची नेटवर्थ ४१ कोटींच्या आसपास आहे.दरम्यान कीर्ती सुरेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती 'कल्की'नंतर 'बेबी जॉन' या सिनेमामध्ये झळकणार आहे. 'बेबी जॉन' या चित्रपटात ती अभिनेता वरुण धवनसोबत खास भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट ख्रिसमसला रिलीज होणार आहे.
कीर्ती सुरेश हायस्कूलमध्ये असताना दोघांची लव्ह स्टोरी सुरु झाली. त्यावेळी अँटनी कॉलेजमध्ये होता. दोघांमध्ये आधी मैत्रीचे नाते निर्माण झाले. या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर प्रेमाच्या नात्यामध्ये झाले. दोघे गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते.