जिगरा आज ओटीटीवर झळकणार
‘पुष्पा’ने गुरुवारी चित्रपटगृहात धडाक्यात एन्ट्री मारल्याने थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचे धाडस कोणी केले नाही. त्यामुळे ओटीटीवर आज ‘जिगरा’, ‘अग्नी’सारखे चित्रपट दाखल होत आहेत. त्याचबरोबर ‘तनाव’चा दुसरा सिजन आज प्रदर्शित होत आहे.
जिगरा । नेटफ्लिक्स
आलिया भट्ट आणि वेदांग रैना अभिनीत, जिगरा हे या आठवड्यात ओटीटी रिलीजच्या यादीतील सर्वात मोठे नाव आहे. वासन बाला दिग्दर्शित ॲक्शन थ्रिलर चित्रपटात सत्या या तरुणीची कथा दाखविण्यात आली आहे. तिच्या भावाला चुकीच्या आरोपाखाली परदेशात तुरुंगात टाकले जाते आणि जिचे आयुष्यात उलथापालथ होते. ती त्याला तुरुंगातून बाहेर काढू शकेल का, याचे उत्तर तुम्हाला नेटफ्लिक्सवर मिळेल.
मेरी । नेटफ्लिक्स
मेरी हा एक बायबलसंबंधी चित्रपट आहे. जो नाझरेथच्या मेरी, एक तरुण ज्यू मुलगी आहे. जी आपल्या नवजात पुत्र येशूचे राजा हेरोडपासून संरक्षण करण्यासाठी जोसेफसह इजिप्तला पळून जाते. डी. जे. कारुसोचे दिग्दर्शन तर नोआ कोहेन, इडो टाको आणि अँथनी हॉपकिन्स यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
नॉनसेन्स ख्रिस्मस विथ सॅब्रिना कारपेंटर । नेटफ्लिक्स
पॉप आयकॉन सबरीना कारपेंटर सर्वांना संगीतमय परफॉर्मन्स आणि मनोरंजक स्किट्सने भरलेल्या विलक्षण हॉलिडे सेलिब्रेशनसाठी आमंत्रित करत आहे. ज्यात सेलिब्रिटी आणि कारा डेलेव्हिंग्ने, सीन एस्टिन आणि इतरांसारखे प्रसिद्ध अतिथी सहभागी होणार आहे.
बिगेस्ट हिस्ट एव्हर । नेटफ्लिक्स
या आठवड्यात नवीन मालिकांंच्या यादीत बिगेस्ट हिस्ट एव्हरचा समावेश आहे. ही मालिका एका असामान्य गुन्हेगार जोडीवर आधारीत आहे, जे बिटकॉइन बोनी आणि क्लाइड म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी केलेली सर्वात मोठी चोरी यामध्ये दाखविण्यात आली आहे.
इकोज ऑफ द पास्ट । नेटफ्लिक्स
इकोज ऑफ द पास्ट ही एक रोमांचक इजिप्शियन मालिका आहे. जी आपल्या बहिणीच्या हत्येचा आरोप असलेल्या येहियाच्या जीवनावर आधारीत आहे. आपले निर्दोषत्व सिद्ध करण्याचा निश्चय करून, आपल्या बहिणीच्या खऱ्या खुन्याचा मुखवटा उघडण्याच्या मोहिमेवर निघतो. या मालिकेत असेर यासिन, महमूद हेमिदा आणि शेरीन रेडा यांच्या भूमिका आहेत.
अग्नी । अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ
प्रतीक गांधी आणि दिव्यांदू अभिनीत राहुल ढोलकिया यांंचा हा चित्रपट अग्निशमन दलाच्या शौर्याचे दर्शन घडवतो. चित्रपटाचे कथानक एका निर्भय अग्निशामकावर केंद्रित आहे, ज्याला शहरातील आग थांबवण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागते.
द स्टिकी । ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ
स्टिकी ही ग्रेट कॅनेडियन मॅपल सिरप हिस्ट द्वारे प्रेरित सहा भागांची गडद कॉमेडी मालिका आहे. जी रुथ लँड्री नावाच्या शेतकऱ्याच्या जीवनावर आधारीत आहे. जो १८ दशलक्ष डॉलर लुटण्यासाठी मॉबस्टर आणि सुरक्षा रक्षकाची मदत घेतो आणि संंकटात सापडतो.
तनाव सीझन २ । सोनी लिव्ह
तनावचा दुसरा सिजन कबीर फारुकी (मानव विज) आणि स्पेशल टास्क ग्रुप (एसटीजी) च्या इतर सदस्यांवर केंद्रित आहेत, जे त्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूचा सामना करतात. अल-दमिष्कने काश्मीरमध्ये अनेक हल्ले घडवून आणले असून फारुकी आणि एसटीजी ते थांंबवू शकतील का, हे आपल्याला मालिका पाहिल्यावर लक्षात येईल.
माएरी । झी ५
हा एक आकर्षक भावनिक थ्रिलर आहे, जो ताराभोवती फिरतो. एक आई जी क्रूर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या तिच्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी बाहेर पडते. पण जेव्हा सिस्टीम तिला न्याय देण्यात अपयशी ठरते, तेव्हा ती प्रकरण स्वत: हातात घेण्याचे ठरवते.
कालरात्री । होइचोई
हा एक आकर्षक बंगाली ड्रामा आहे, जो देवी नावाच्या एका तरुणीच्या भोवती फिरतो, जी तिच्या पतीच्या मृत्यूशी संबंधित एक भविष्यवाणी उलगडताना पाहत असताना स्वतःला गूढतेच्या जाळ्यात अडकवते.
फ्लाय मी टू द मून । अॅपल टीव्ही+
फ्लाय मी टू द मून हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो नासा लाँच डायरेक्टर आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह भोवती फिरतो. जे एक मिशन अयशस्वी झाल्यास बनावट मून लँडिंग स्टेज करण्यासाठी एकत्र येतात. स्कारलेट जोहान्सन, चॅनिंग टॅटम आणि वुडी हॅरेल्सन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट ग्रेग बर्लांटीने दिग्दर्शित केला आहे.