नात्या-नात्यातील गुंतागुंत अनुभवा ‘वनवास’मध्ये
आज नवीन ओटीटी आणि चित्रपटगृहात अनेक चित्रपट आणि वेब सिरीज दाखल हाेत आहेत. यामध्ये नाना पाटेकर यांचा हृदयस्पर्शी कौटुंबिक चित्रपट ‘वनवास’ पासून ते ॲनिमेटेड म्युझिकल ड्रामा ‘मुफासा: द लायन किंग’ यांचा समावेश आहे.
वनवास । थिएटर्स
वनवास हा एक हृदयस्पर्शी चित्रपट आहे, जो स्मृतिभ्रंश असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर केंद्रित आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित (गदर २ फेम) या आगामी चित्रपटात नाना पाटेकर, खूशबू सुंदर, उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर प्रमुख भूमिकेत आहेत.
यो यो हनी सिंह: फेमस । नेटफ्लिक्स
यो यो हनी सिंग: फेमस हे या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या ओटीटी रिलिजमध्ये मोठे नाव आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये भारतीय रॅपर यो यो हनी सिंगचा सुरुवातीचा संघर्ष, प्रसिद्धीचा उदय, नाट्यमय पडझड आणि संगीतात त्याचे पुनरागमन याचा इतिहास दाखविण्यात आला आहे.
मुफासा: द लायन किंग । थिएटर
चित्रपटगृहात मुफासा: द लायन किंग आज झळकणार आहे. हा चित्रपट द लायन किंग (२०१९) चा प्रीक्वल आणि सिक्वेल आहे. या ॲनिमेटेड साहसी-फँटसी चित्रपटात मुफासा या सिंहाची मूळ कथा सांगण्यात आली आहे. जो पुढे जाऊन प्राइड लँड्सचा अंतिम शासक बनतो.
द सिक्स ट्रीपल एट । नेटफ्लिक्स
सिक्स ट्रिपल एट हा आकर्षक युद्ध चित्रपट आहे, जाे ६८८८ व्या सेंट्रल पोस्टल डिरेक्टरी बटालियनची कथा सांगतो. ही ८५५ कृष्णवर्णीय महिलांची बटालियन आहे. ज्या द्वितीय विश्वयुद्धात सामील झाल्या होत्या. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन टायलर पेरी यांनी केले आहे.
बॉय किल्स वर्ल्ड । लायन्सगेट प्ले
हा एक ॲक्शन-पॅक थ्रिलर चित्रपट आहे. एक कर्णबधिर माणूस, ज्याचे आयुष्य त्याच्या कुटुंबाच्या अकाली मृत्यूनंतर उलथापालथ होते. तो हिल्डा व्हॅन डेर कोय या महिलेला मारण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेतो, ज्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मारले.
उमजोलो: डे वन । नेटफ्लिक्स
हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट जो दोन जवळच्या मित्रांभोवती फिरतो. झानेले आणि अँडिले, ज्यांचे आयुष्य त्यांच्यापैकी एकाचे लग्न झाल्यावर उद्ध्वस्त होते.
फेरी २ - नेटफ्लिक्स
फेरीचे निर्माते एक नवीन भाग घेऊन परतले आहेत, जे फेरी बौमन, माजी ड्रग लॉर्ड, ज्याचे शांत जीवन त्यांच्या भूतकाळातील एका भुताने हादरले आहे. त्याची पुढील कथा आपल्याला दुसऱ्या सिझनमध्ये पहायला मिळणार आहे.