पर्यटन मंत्री रोहन खंवटे; २८ ते ३० डिसेंबर दरम्यान आयोजन
पणजी : धारगळ पंचायत मंडळाने मान्यता दिल्यानंतर पर्यटन खात्याने सनबर्न फेस्टिव्हलला तत्त्वत: मान्यता दिली आहे. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान हा महोत्सव धारगळात होणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. कोविड महामारी वगळता राज्यात दरवर्षी सनबर्न फेस्टिव्हल वर्षाच्या शेवटी आयोजित होत असतो.
सर्व परवानग्या मिळवण्याची जबाबदारी आयोजक कंपनीची आहे. पंचायतीच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासह इतर सर्व परवानग्या घ्याव्या लागतील. सर्व परवाने मिळाल्यानंतरच मंजुरी दिली जाईल. सध्या तत्त्वत: मान्यता दिली आहे. कंपनी परवाने मिळवण्यात अपयशी ठरल्यास मान्यता रद्द करण्याचा अधिकार सरकारला आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
सनबर्नचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा. लि. यांनी ग्रामसभेच्या ठरावाला पंचायत संचालकांकडे आव्हान दिले आहे. धारगळ ग्रामसभेत सनबर्नला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला होता. गोवा पंचायती राज कायद्याच्या कलम ६(५) अन्वये हे आव्हान दिले होते.
ग्रामसभेच्या ठरावाला १८ डिसेंबरपर्यंत स्थगिती