गोव्यात ७४,९९२ परप्रांतीय कामगारांची नोंद

ई-श्रम पोर्टलवरील आकडेवारीतून आले समोर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14 hours ago
गोव्यात ७४,९९२ परप्रांतीय कामगारांची नोंद

पणजी : राज्यात ७४,९९२ परप्रांतीय कामगारांची नोंद आहे. रोजगारासाठी विविध राज्यांतून गोव्यात आलेल्या कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या गोव्यात दरवर्षी नोकरीच्या लाखो संधी उपलब्ध होत असतात. त्यामुळे विविध राज्यांतील कामगार वर्गाचे पाय गोव्याकडे वळत आहेत. या राज्यांतून दरवर्षी हजारो कामगार गोव्यात येतात. काही जण कायमचे स्था​यिक होतात. तर, काही जण केवळ कामासाठीच गोव्यात आलेले असतात. गोव्यात रोजगारासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागते. आतापर्यंत गोव्यात आलेल्या अशा ७४,९९२ कामगारांनी ई-पोर्टलवर नोंदणी केल्याचे या आकडेवारीतून दिसून येते.

मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक परप्रांतीय कामगार नोंदणी

दरम्यान, सर्वाधिक परप्रांतीय कामगारांची नोंदणी असलेल्या राज्यांच्या यादीत मध्यप्रदेश प्रथमस्थानी आहे. तेथे १,८३,८७,७२३ कामगारांनी नोंदणी केलेली आहे. दुसऱ्या स्थानी​ महाराष्ट्र असून, तेथे १,७२,५५,०२३ कामगारांची नोंद आहे. त्यानंतर गुजरातचा क्रमांक लागत असून, तेथे १,१८,६६,४६३ कामगारांची नोंदणी आहे. 

हेही वाचा