फॉरेन्सिक टीमला येथील एका नाल्यात पाकिस्तान मेड ९ एमएमचे २ मिसफायर्ड काडतुस आणि १ ब्लँक काडतूस आढळून आलेत. या गोष्टी येथे नेमक्या कशा आल्या याबाबत विविध अंगांनी तपास सुरू आहे.
संभल : मंगळवारी उत्तर प्रदेशातील संभल हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन समोर आले. येथील कोट गारवी परिसरातील नाल्यांमधून फॉरेन्सिक टीमला ५ ब्लँक काडतूस आणि १ मिसफायर्ड काडतूस सापडले आहे. या प्रकारचा दारुगोळा पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरी (पीओएफ) मध्ये बनवला जातो. या प्रकारची काडतुसे पाकिस्तानी लष्कराकडून वापरली जातात.
शाही जामा मशीद हे हरिहर मंदिर असल्याचा दावा १९ नोव्हेंबर रोजी हिंदू पक्षाने चंदौसी न्यायालयात दावा केला होता दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर २४ नोव्हेंबर रोजी मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हजारोंच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार केला. या हिंसाचारात ५ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक पोलीस जखमी झाले होते. नंतर हिंसाचार नेमका कसा उफाळला हे शोधण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली. फॉरेन्सिक टीम आणि पालिकेने आज तपास केला असता अतिशय धक्कादायक बाब समोर आली. येथे तपासात एक पीओएफ ९एमएम तसेच एक ६८-२६ फायर केस सापडला. याच प्रमाणे, एक एफएन स्टार असलेला मिसफायर देखील आढळून आला आहे. यास मिसफायर यास्तहीच म्हटले आहे कारण त्याच्यावर स्ट्रायकरची खूण आहे. सदर माहिती संभलचे अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई यांनी दिली आहे.
येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी श्रीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार झालेले ९ एमएमचे २ मिसफायर्ड काडतुस आणि १ ब्लँक काडतूस जप्त करण्यात आले आहे. याशिवाय १२ बोअरचे दोन काडतूस आणि ३२ बोअरची दोन काडतूस देखील जप्त करण्यात आले. एक शेल विंचेस्टर (अमेरिकन मेड) आहे. असे एकूण ६ नमुने विविध भागांतून गोला करण्यात आले आहे. दरम्यान संभल येथी हिंसाचारात पाकिस्तानी हस्तक्षेप असल्याचे हे पुरावे हाती लागल्याने तपास यंत्रणा अलर्टमोडवर आहेत.
एका महितीनुसार, जामा मशीद सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारात शहरातील विविध भागातून दगडफेक करणारे आले होते. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या २५ आरोपींपैकी १३ आरोपी हिंसाग्रस्त भागातील रहिवासी नाहीत. त्यांची घरे ३ ते ६ किलोमीटर अंतरावर आहेत. काही आरोपी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या भागातील आहेत. मृत्युमुखी पडलेल्या चार तरुणांपैकी तीन तरुण जामा मशीद परिसरात राहत नव्हते अशीही माहिती समोर येत आहे.
दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, आज संभलमध्ये राहुल गांधी आणि पप्रियंका गांधी येत आहेत. त्याच्या येण्याने येथे गंभीर स्थिती उद्भवू शकते. यासाठी संभलच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गौतमबुद्ध नगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहीत राहुल गांधी प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेशच्या सीमेवरच अडवण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे. त्यानुसार सद्यघडिस राहुल गांधी यांना अडवण्यात आले आहे. सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
बातमी अपडेट होत आहे