आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून महिला कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या

आधी कारची धडक, नंतर चाकूचे वार; दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने भावाने उचलले शेवटचे पाऊल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 01:49 pm
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून महिला कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या

हैदराबाद: इब्राहिमपट्टणम, हयाथनगर मधून एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याची माहिती समोर येत असून सदर महिला पोलीस कॉन्स्टेबल असल्याचे समजतेय. कोंगारा नागमणी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव असून कोंगाराने दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केल्याने संतापलेल्या तिच्या भावानेच कोंगाराची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ माजली आहे.woman constable: Telangana woman constable murdered, honour killing  suspected

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपोळ गावाजवळ सोमवारी ही घटना घडली. कोंगारा तिच्या स्कूटरवरून रायपोळहून मानेगुडाला जात असताना तिचा भाऊ परमेश याने कोंगाराच्या स्कूटरला त्याच्या कारने धडक दिली. ती पडल्यावर परमेशने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात नागमणीचा जागीच मृत्यू झाला.

कोंगारा नागमणी ही २०२० बॅचची पोलीस हवालदार होते. नुकतेच तिने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न केले होते. या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. लग्नानंतर नागमणी यांच्या कुटुंबात तणाव वाढला होता. त्यामुळे रागाच्या भरात तिच्या भावाने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हत्येनंतर आरोपी परमेश घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी परमेशवर गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

शेवटचा फोन कॉल -

याबाबत कोंगारा नागमणीच्या पतीने सांगितले की, सोमवारी सकाळी मी माझ्या पत्नीला फोन केला होता. त्यावेळी आमच्या जास्त संभाषण होऊ शकले नाही. फोनवर कोंगारा एवढेच म्हणाली कि, तिचा भाऊ तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत असून तो आपल्या लग्नामुळे नाखूष आहे. मात्र एवढे बोलून कॉल डिस्कनेक्ट झाला.