महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब. एकनाथ शिंदे आणि अजित पवार असतील उपमुख्यमंत्री.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ११ दिवसांनी शिंदेंच्या नाराजी नाट्यावर पडदा टाकत, भाजपने देवेंद्र फडणवीस यांची पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली आहे. चंद्रकांत पाटील व सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या विधी मंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तसेच पंकजा मुंडे यांनी या प्रस्तावास अनुमोदन दिले. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे घर मत बसा लेना. मै समंदर हू लौटकर फिर आऊंगा' असे ४-५ वर्षांपूर्वी फडणवीस एका सभेत म्हणाले होते. आता ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा आरुढ होणार आहेत. 'तुम्ही येथे आहात, म्हणून मी येथे आहे.. तुम्ही नसता तर कदाचित मी येथे दिसलोच नसतो' असे देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपदी आपले नाव निश्चित झाल्यानंतर सर्वांचे आभार मानत म्हणाले.
दरम्यान प्राप्त माहितीनुसार, उपमुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची नावे निश्चित झाली आहेत. महायुतीच्या आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज दुपारी तीन वाजता महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विधानभवनात सर्वपक्षीय नेत्यांची गर्दी झाली होती, १० वाजता भाजपच्या कोअर कमिटीची तसेच ११ वाजता पक्षाच्या विधीमंडळाची बैठक पार पडली. यात पर्यवेक्षक म्हणून विजय रुपाणी व निर्मला सितारामन यांनी काम पाहिले. बैठकी आधी या दोघांनी शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील भेट घेतली होती.
आता, उद्या म्हणजेच ५ डिसेंबर रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. याअनुषंगाने मैदानानावर तीन वेगवेगळे भलेमोठे मंच उभारण्यात आले आहे. यासोहळ्यात हजारोंच्या संख्येने राज्यातील नागरिक उपस्थित असतील. या भव्य शपथविधी सोहळ्यास नरेंद्र मोदी व भाजपचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित राहतील. या अनुषंगाने आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे काम सुरू आहे.
मंत्रिपदांच्या यादीत या भाजप नेत्यांची नावे
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
पंकजा मुंडे
गिरीश महाजन
आशिष शेलार
रवींद्र चव्हाण
अतुल वाचवा
सुधीर मुनगंटीवार
नितेश राणे
गणेश नाईक
मंगल प्रभात लोढा
राहुल नार्वेकर
अतुल भातखळकर
शिवेंद्रराज भोसले
गोपीचंद पडळकर
माधुरी मिसाळ
राधाकृष्ण विखे पाटील
जयकुमार रावल
राष्ट्रवादीचे हे नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात
अजित पवार
धनंजय मुंडे
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
दिलीप वळसे पाटील
आदिती तटकरे
धर्मरावबाबा आत्राम
शिवसेनेचे हे नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात
एकनाथ शिंदे
दीपक केसरकर
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
परिस्थितीनुरूप नावे बदलण्याची शक्यता आहे.
बातमी अपडेट होत आहे..