कंपनीने वेतन अडविल्यानंतर पळविले १.५ लाखांचे साहित्य

सरव्यवस्थापकाविरोधात अपरातफरीची तक्रार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st December, 11:56 pm
कंपनीने वेतन अडविल्यानंतर पळविले १.५ लाखांचे साहित्य

पणजी : कंपनीने वेतन अडवल्यानंतर सरव्यवस्थापक कंपनीचे १.५ लाख रुपये किमतीचे लॅपटाॅप, टॅब्लेट, स्कुटर व इतर साहित्य घेऊन गेला. कंपनीने सरव्यवस्थापकाविरोधात अफरातफर केल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आगशी पोलिसांनी धर्मापूर - सासष्टी येथील राॅय फर्नांडिस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विंददेव ग्रुपचे भागीदार विनय कुमार के.एम. यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, कंपनीच्या गोव्यातील आस्थापनांत सरव्यवस्थापक राॅय फर्नांडिस याची नियुक्ती केली होती. काही कारणांमुळे कंपनीने त्याचे वेतन अडवून ठेवले होते. दरम्यान, जून ते १ जुलै २०२४ दरम्यान फर्नांडिस हा कंपनीचे १.५ लाख रुपये किमतीचे लॅपटाॅप, टॅब्लेट, स्कुटर व इतर साहित्य घेऊन गेल्याची तक्रार दाखल केली आहे. याची दखल घेऊन आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्निल नाईक यांनी संशयित राॅय फर्नांडिस याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१४, ३१६(४) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा