लसूण ६०० रुपये किलो : भाजीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता
पणजी : मागील आवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात काही भाज्यांच्या दरात किरकोळ घट झाली. गाजराचे दर ४० रुपयांनी कमी होऊन ८० रुपये किलो झाले. कांद्याचे दर १० रुपयांनी कमी होऊन ७० रुपये किलो झाले. बटाटा आणि टोमॅटोचे दर १० रुपयांनी कमी होऊन प्रत्येकी ५० रुपये किलो झाले. मिरचीचे दर १२० रुपयांवरून ८० ते १०० रुपये झाले. पुढील काही दिवसात भाज्यांचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सोमवारी पणजी बाजारात फ्लॉवरचा दर २० रुपयांनी कमी होऊन ४० रुपयाला एक नग झाला होता. कोथिंबीर १० रुपयांनी स्वस्त होऊन २० रुपये जुडी झाली. कोबीचे दर १० रुपयांनी कमी होऊन ५० रुपये किलो झाले. बीटाचे दर २० रुपयांनी कमी होऊन ८० रुपये किलो झाले. आवक वाढल्याने मटारचे दर ४० रुपयांनी कमी होऊन १६० रुपये किलो झाले. लसणाचे दर ६०० रुपये किलो होते. तर आल्याचे दर १६० रुपये किलो होते.
बाजारात दुधी भोपळ्याचे दर १० रुपयांनी कमी होऊन ४० रुपये किलो झाला होता. लिंबू आकारानुसार ४ ते ५ रुपयेला एक नग या दराने विकला जात होता. नारळाचे दर आकारानुसार ३० ते ४० रुपये होते. वालपापडीचा दर १२० रु. किलो होता. काकडीचा दर ५० रुपये किलो होता. ढब्बू मिरची ८० रुपये किलो होती. भेंडी, वांगी, गवार ,कारले प्रत्येकी ८० रुपये किलो होते.
सोमवारी पणजी बाजारात पालेभाजी महागच होती. मेथीची एक जुडी ३० रु. ,पालक , तांबडी भाजी आणि कांदा पात प्रत्येकी १५ रुपये जुडी होते. शेपू २० रुपये तर मुळा २० रुपयेला एक जुडी होती. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा ६५ रु., बटाटा ४४ रु., टोमॅटो ४२ रु., वालपापडी ५९ रु. , मिरची ४० रु., भेंडी ६० रु. , गाजर ६९ रु. तर कोबी ४० रुपये प्रती किलो दराने विकले जात होते. फ्लॉवरच्या एका नगाचा दर ४२ रुपये होता.
शेवगा @ ४५०
गेले काही दिवस पणजी बाजारात शेवग्याची आवक खूपच कमी झाली आहे. यामुळे शेवगा सहजासहजी उपलब्ध होत नाही. पणजी शहरात काही दुकानात शेवगा ४५० ते ५०० रुपये किलो दराने विकला जात आहे.