पद्मश्रीसाठी डॉ. रामाणी, अल्बुकर्क यांची शिफारस

पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा २५ जानेवारी २०२५ रोजी


02nd December, 11:34 pm
पद्मश्रीसाठी डॉ. रामाणी, अल्बुकर्क यांची शिफारस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने पुढील वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी गोव्यातर्फे डॉ. प्रेमानंद रामाणी आणि दिवंगत व्यावसायिक व्हिक्टर अल्बुकर्क यांच्या नावांची शिफारस केली आहे. शिफारस देण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत होती. पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा २५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे.
डॉ. प्रेमानंद रामाणी प्रसिद्ध न्युरोसर्जन, लेखक आहेत. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३८ रोजी वाडी-तळावली (फोंडा) येथे झाला. त्यांनी फोंडा येथील ए. जे. अल्मेदा शाळेतून शिक्षण घेतले. त्यांनी १९६५ मध्ये मुंबईच्या टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयातून एमबीबीएस केले. त्यांनी इंग्लंडमध्ये काही काळ प्रॅक्टिस केली. सध्या ते लीलवती इस्पितळात काम करत आहेत.
व्हिक्टर अल्बुकर्क यांनी करियरची सुरुवात पीडब्ल्यूडीमध्ये साहाय्यक अभियंता म्हणून केली. १९७० मध्ये त्यांनी भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू केला. १९८० ते १९८३ दरम्यान त्यांनी अलकॉन समूहाची स्थापना केली. त्यांनी रिसोर्ट, इस्पितळ, नर्सिंग महाविद्याय उभारले. मार्च २०२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा