महाराष्ट्र। शपथविधीचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्र्याचे नाव गुलदस्त्यात

देवेंद्र फडणवीसांचे नाव आघाडीवर; एकनाथ शिंदे गावाला

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
30th November, 11:39 pm
महाराष्ट्र। शपथविधीचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्र्याचे नाव गुलदस्त्यात

मुंबई : महाराष्ट्रात ५ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी घोषणा भाजपतर्फे करण्यात आली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही शपथविधी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दरम्यान मुंबईहून साताऱ्यातील आपल्या गावी पोहोचलेले राज्याचे कार्यवाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत.


पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान मोदींची उपस्थिती असेल, असे महाराष्ट्र भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


हेही वाचा