सनबर्न पेडण्यात नकोच!

जनतेबरोबरच आमदार प्रवीण आर्लेकरांचाही विरोध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
सनबर्न पेडण्यात नकोच!

सनबर्न विरोधात जमलेले नागरिक.

पेडणे : सनबर्न लोकांना नको असेल तर आम्हाला पण नको. मला विश्वासात न घेता हा निर्णय सरकारने घेतला आहे. धारगळ पंचायत मंडळाने पेडणे तालुक्यातील जनतेच्या भावनेचा विचार करुन सनबर्नला परवानगी नाकारावी, असे आवाहन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले आहे,
धारेश्वर माऊली संस्थानने सनबर्नच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पेडणे तालुक्यातील जनतेला मारलेल्या हाकेला प्रतिसाद म्हणून रविवारी सायंकाळी धारगळ पंचायतीच्या समोर पेडणे तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सनबर्न पेडण्याच्या भविष्याला विद्रूप करणार आहे. सनबर्नमध्ये मद्य, ड्रग्जचा वापर होत असतो. यामुळे युवा पिढी बरबाद होईल. संस्कृती नष्ट करणारा हा सनबर्न सरकारने रद्द करावा, अशी मागणी अनेक वक्त्यांनी केली.
अमित सावंत, रामा काणकोणकर, रामा वारंग, प्रशांत नाईक, शंकर पोळजी, भास्कर नारुलकर, अॅड. जीतेंद्र गावकर, गौरी जोसलकर, अनिकेत साळगावकर, देवेंद्र देसाई, भूषण नाईक, राजन कोरगांवकर, तुकाराम हरमलकर आदींनी विचार मांडले.
धारगळ येथे होणाऱ्या नियोजित सनबर्नला विरोध करण्यासाठी हजारो नागरिक पंचायत कार्यालयासमोर जमले होते. बंदोबस्तासाठी पोलीसही तैनात होते. मोपा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नारायण चिमुलकर, पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्यासह उपअधीक्षक आशिष शिरोडकर उपस्थित होते.             

हेही वाचा