फोंडा : माशेल येथील बाजारात उभी करुन ठेवलेल्या स्कूटर चोरीप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या दिलबहादूर शिखाराम महातो (३५, माशेल, मूळ नेपाळ) याला न्यायालयाने दोषी ठरवून २० दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. महातोने न्यायालयात गुन्हा कबूल केल्याने त्याला कारावासाची शिक्षा दिली. दि. ९ नोव्हेंबर रोजी स्कूटर चोरीचा प्रकार घडला होता.
स्कूटर चोरी प्रकरणात म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या महातोने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्याने महातोला २० दिवस कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
माशेल येथील बाजारात दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ ते १०.३० वाजण्याच्या सुमारास उभी केलेली स्कूटर चोरीला गेली होती. स्कूटर मालक श्याम रोहिदास नाईक (५५, अमेयवाडा - खांडोळा) यांनी पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली होती. त्याच दिवशी संध्याकाळी महातो स्कूटर घेऊन फिरताना पोलिसांचा जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला अटक केली. म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांनी याप्रकरणी तपास केला होता.