म्हापसा बाजारात कांदा ५० ते ५५ रुपये किलो : इतर भाजीपाल्याचे दर स्थिर
म्हापसा : येथील बाजारपेठेत चालू आठवड्यात कांद्याचा भाव १० रुपयांनी वाढला आहे. तर टॉमेटोसह इतर भाजीपाल्याचा दर समान राहिला आहे.
भाजीपाल्याचा घाऊक बाजार भाव प्रति किलोप्रमाणे टॉमेटो ३० रुपये, बटाटे ४५ रु., कांदा ५०-५५ रुपये, गाजर ८० रुपये, वांगी ५० रुपये, ढब्बू मिरची ७० रुपये, कोबी ३५ रुपये, कॉली प्लॉवर ४५ रुपये, दुधी ३५ रुपये, मिरची ५० रुपये, मडगड मिरची ४० रुपये, आले ८० रुपये, लसूण ३४० रुपये, भेंडी ६० रुपये, लिंबू ४ रुपये नग, पालक १० रुपये मुळी, तांबडीभाजी १० रुपये मुळी, कोथिंबीर २० रुपये मुळी, शेपू १० रुपये मुळी, कांदा पात १० रुपये मुळी, मेथी १० रुपये मुळी, मका ४० रु. तीन नग, करेला ५० रुपये, दोडगी ५० रुपये, बीट ५० रुपये, वालपापडी ६० रुपये, वाल ५० रुपये, काकडी ४० रुपये.
मासळीचे दर (प्रति किलो)
इसवण १०० रु.
चणाक ५००-६०० रु.
पापलेट ८०० रु.
काळी पापलेट ४०० रु.
सुगंटा (कोळंबी) ४०० रु.
कर्ली २५० रु.
बांगडा १०० रु.
टोकी २०० रु.
लेपो २०० रु.
खेकडे २५० रु.
खुबे-तिसऱ्या २०० रु.
वेरली १५० रु.
माणक्या ४५० रु.
दोडयारे २०० रु.
मडसो ४०० रु.
मुटूशो ४०० रु.
कोकार २५० रु.
चिकन १८० रु.
मटन ८०० रु. अंडी ७५ रु. डझन.