आगरवाडा-चोपडेच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या हेमंत चोपडेकर यांचे अभिनंदन करताना पंच भगीरथ गावकर, सचिन राऊत, अँथोनी फर्नांडिस, शिल्पा राऊत नाईक, संगीता नाईक, दीपाली लिंगुडकर.
पेडणे : आगरवाडा-चोपडे पंचायतीच्या सरपंचपदी अनुसूचित जातीच्या हेमंत चोपडेकर यांची बिनविरोध निवड झाली. मांद्रे मतदारसंघात अनुसूचित जातीजमातीमधील ते पाहिले सरपंच ठरले आहेत.
मंगळवारी आगरवाडा-चोपडे पंचायतीत पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत चोपडे-खुर्बानवाडा येथील पंच हेमंत चोपडेकर यांचा एकमेव अर्ज सादर झाला होता. चोपडेचे दुसरे पंच तथा माजी सरपंच भगीरथ गावकर यांनी त्यांचे नाव सुचविले. त्यांना मावळते सरपंच तथा पंच सचिन राऊत यांनी अनुमोदन दिले.
मंगळवारी पार पडलेल्या या सरपंचपदाच्या निवडणुकीला हेमंत चोपडेकर यांच्यासह सचिन राऊत, अँथोनी फर्नांडिस, भगीरथ गावकर, शिल्पा राऊत नाईक, संगीता नाईक, दीपाली लिंगुडकर आदी पंच सदस्य उपस्थित होते. पेडणे गट विकास कार्यालयाचे अधिकारी भिवा ठाकूर यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना आगरवाडा-चोपडे पंचायतीच्या सचिव करिश्मा मोरजकर यांनी साहाय्य केले.
डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळे मांद्रेच्या इतिहासात अनुसूचित जातीमधून पहिला सरपंच होण्याचा बहुमान मला आगरवाडा-चोपडे वासीयांनी मिळवून दिला त्याबद्दल मी मनःपूर्वक सर्वांचे आभार मानतो. यापुढे आमदारांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पंच आणि प्रत्येक नागरिकाच्या पंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. _ हेमंत चोपडेकर, नवनिर्वाचित सरपंच, आगरवाडा-चोपडे