यूपी : कन्नौजमध्ये भीषण अपघात: सैफई मेडिकल कॉलेजच्या ५ डॉक्टरांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बुधवारी (२७ नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजता ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सैफई मेडिकल कॉलेजच्या ५ डॉक्टरांचा मृत्यू झाला. लखनौमध्ये आयोजित एका लग्न समारंभातून सर्वजण परतत होते.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
यूपी : कन्नौजमध्ये भीषण अपघात: सैफई मेडिकल कॉलेजच्या ५  डॉक्टरांचा मृत्यू

लखनौ :   उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बुधवारी पहाटे एक भीषण रस्ता अपघात घडला . लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर तिरवाजवळ पहाटे ३.३० वाजता झालेल्या या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजच्या पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकली आणि दुसऱ्या लेनमध्ये जाणाऱ्या ट्रकला धडकली. 

अपघाताच्या वेळी कारमध्ये ६ जण होते. यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये समावेश असलेले सर्व जण सैफई मेडिकल कॉलेजमधून मेडिसिनमध्ये पीजी करत होते. मंगळवारी लखनऊमध्ये आयोजित एका लग्न समारंभातून परतत होते.  

या अपघाताची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर पहाटे ३:४५ वाजता मिळाली. बहुधा चालक झोपी गेल्याने आणि अतिवेगाने हा अपघात झाला असावा अशी शक्यताही वर्तवली जात आहे. डॉक्टरांची गाडी आधी दुभाजकाला धडकली आणि नंतर अनेकवेळा उलटल्यानंतर दुसऱ्या लेनमध्ये जाऊन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला धडकली.  

हेही वाचा