महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे कारभार सांभाळतील, सूत्रांची माहिती

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
26th November, 10:17 am
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देणार

मुंबई:  विधानसभा निवडणुकीत महायुतीला भक्कम यश मिळाले असून महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आज राज्यपालांची भेट घेणार आहेत. विधानसभेचा कार्यकाळ संपवल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. त्याशिवाय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहेत. महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेची आज मुदत संपत असून नवीन सरकार स्थापन होईपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदे कारभार सांभाळणार आहेत.  

मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. 

तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी अशी मागणी प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर यांच्यासहीत आशिष शेलार यांनी केली आहे. मात्र महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं आहे.

हेही वाचा