कोलमडलेल्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर तसेच येथील विक्षिप्त मानसिकतेवर प्रकाश टाकणारा एका पाकिस्तानी महिलेचा धक्कादायक इंटरव्यू पुन्हा व्हायरल
लाहोर : पाकिस्तानची अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईला आलेली आहे. एका अहवालानुसार येथील तब्बल ३८ टक्के जनता ही दारिद्र्यरेषेखाली असून हलाखीचे जीवन जगत आहे. पाकिस्तानकडे आपल्या जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठीदेखील पुरेसा निधी उपलब्ध नाही. येथील नेते मात्र आपल्या आलीशान जीवनशैलीसाठी ओळखले जातात. येथील अर्थव्यवस्थाच पूर्णपणे आंतराष्ट्रीय नाणेनिधीच्या कृपेने चालत असल्याचे दृश्य नेहमीच दृष्टीस पडते. अशा या भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील नेहमीच धिंडवडे निघतात. दरम्यान मागेच सौदी अरबमध्ये प्रशासनाने तेथे वास्तव्यास असलेल्या काही पाकिस्तानी नागरिकांना 'भीक मागून स्थानिकांना त्रास केल्याच्या आरोपांखाली' अटक करत पुन्हा मायदेशी पाठवले होते.
दरम्यान आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेचे लग्नाचे वय झाले म्हणून तिच्या वडिलांनी तिचे लग्न लावून देण्याचे ठरवले. सदर महिला ही उच्चशिक्षित डॉक्टर असून तिचे लग्न एका गर्भश्रीमंत कुटुंबात करून देण्यात आले. तिच्या आईवडिलांना मध्यस्थाकडून सदर कुटुंबीय 'इम्पोर्ट-एक्स्पोर्ट'च्या व्यवसायात असल्याचे सांगण्यात आले होते. लग्नानंतर मुलीला आलीशान घरात सर्व सुखसोई देण्यात आल्या. तिची स्वतःची कार, स्वीमिंगपूल फेसिंग गॅलरी असलेला भलामोठा बेडरूम, दागदागिने-मेकअपचे सामान तसेच तिच्या दीमतीला दोन मदतनीस देखील ठेवण्यात आल्या. तिच्या एका हुकमावरून तिला सर्व गोष्टी पुरवल्या जायच्या.
दरम्यान एकदिवस तिने आपणास कामावर घेऊन जावे,घरी बसून कंटाळा येतोय, तिलाही ऑफिस बघायचे आहे असे म्हणत पतीसोबत कामावर जाण्याचा हट्ट केला. मात्र तिच्या सासूने तिला बाईमाणसाने कामावर जाणे योग्य नाही म्हणत हा मुद्दा टाळला. तिनेही पुन्हा कधी विचारले नाही. तिचा नवरा आणि सासरे सकाळी उठून कामाला जायचे आणि सायंकाळी दमून भागून घरी यायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा तिला नेहमीच कोड्यात टाकायचा. पण तिने कधी प्रश्न केले नाहीत. ती ऐश्वर्यात लोळत होती. तिच्या मैत्रिणी देखील तिची ही स्थिती पाहून तिचा हेवा करत होत्या.
तिच्या लग्नाला तब्बल चार महीने झाले होते. पती-पत्नीचा सुखाचा संसार चालला होता. सगळे काही सुरळीत होते. एक दिवस या महिलेने 'मी घरात बसून बसून जाडी होत आहे, मला जीममध्ये जाऊ द्यावे' असे म्हणत तिच्या पतीकडे जीममध्ये जाऊ देण्याचा हट्ट धरला. तिच्या पटीने आपल्याकडेही खाली तळघरात एक जीम आहे,, मात्र थोडी साफसफाई करावे लागेल असे सांगितले. महिला खुश झाली. दुसऱ्या दिवशी तिचा पती आणि कुटुंबाचे इतर सदस्यही कामानिमित्त घराबाहेर पडले. यावेळी सदर महिलेने तळघरात जात येथे साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. साफ सफाई करत ती जीम मधील एका अंधाऱ्या खोलीत गेली. येथील् दृश्य पाहून तिच्या पायांखालील जमीनच सरकली. येथे भिकाऱ्यांची वेशभूषा असलेले फाटके कपडे, झोळ्या, विविध प्रकारच्या केशभूषा आणि मेकअपचे सामान आणि जीर्ण झालेली भांडी दिसली. हा नेमका प्रकार काय ? हे तिने जाणून घेण्याचे ठरवले.
एकंदरीत प्रकारामुळे तिला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तीचे सासरे-पती आणि घरातील इतर सदस्यही कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर तिने त्यांचा पाठलाग केला. एका ट्राफिक सिग्नलवर गाडी थांबली असता, तिला एक ओळखीची व्यक्ती सिग्नलजवळच भीक मागताना दिसली. निट निरखून पहिले तर तो तिच्या दिरासारखाच दिसू लागला. कदाचित चेहऱ्यात साम्य असेल म्हणून तिने दुर्लक्ष केले. पुढे गेल्यावर एका वकणावर तिला अजून एक धक्का बसला. तीचे सासरे व पती चक्क भिकाऱ्याच्या वेशात होते व दयनीय हावभाव करत भीक मागत होते. तिला रडू कोसळले व ती घरी आली.
तिचा दीर पायाने अधू असल्याचे नाटक करायचा तर तिची सासू दोन्ही पायाने अपंग असल्याचा बनाव करायची. तिचा पती नेहमीच हातावर पट्ट्या बांधून आपल्या समोर एक भांडे ठेवायचा. हा प्रकार समोर आल्यानंतर तिने आपल्या सासरच्या मंडळींना याबाबत विचारणा केली तर त्यांनी तिच्यावर शारीरिक अत्याचारही केले. तिने आधी हा प्रकार सहन केला पण नंतर आपल्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली व तिला तिच्या सासुरवाडीतून घेऊन जाण्यास सांगितले. एकंदरीत प्रकार जाणून घेतल्यानंतर तिच्या पालकांना आपल्या चुकांची उपरती झाली.
सदर महिलेने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या मुलाखतीच्या शेवटी डॉक्टर शाजिया या महिलेने संपत्ती-पैसा यांच्या मोहात न अडकण्याबाबत सल्लाही दिला आहे. कुणाशीही लग्न करायचे असल्यास त्याच्याबाबत पूर्ण माहिती जाणून घ्या असे ती म्हणते. सदर मुलाखत पाकिस्तानी यूट्यूबर सय्यद बासीत अली याच्या यूट्यूब पेजवर अपपलोड करण्यात आला असून आजवर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सय्यद बासीत अली हा आपल्या यूट्यूब चॅनलवर पाकिस्तानी समाजातील अनेक गमतीशीर तसेच अंतर्मुख करणारे किस्से प्रेक्षकांसमोर घेऊन येतो.