पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर, इस्लामाबाद विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली
इस्लामाबाद: माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटून इम्रान खान यांच्या समर्थकांनी राजधानी इस्लामाबाद वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. हिंसाचारात चार पोलीसांचा मृत्यू झाला असून १०० हुन अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानमध्ये, खैबर पख्तुनख्वा राज्याचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि विरोधी पक्षनेते उमर अयुब यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) समर्थकांचा ताफा इस्लामाबादला जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. वृत्तानुसार, पोलिस आणि पीटीआय समर्थकांमध्ये हाणामारी झाली.
राजधानीच्या दिशेने कूच करणाऱ्या पीटीआय समर्थकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी ताफ्याला अटकेचा अट्टक पूल, चाच इंटरचेंज आणि गाझी बरोठा कालव्याजवळ रोखण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
माजी पंतप्रधानांच्या सुटकेची मागणी:-
पीटीआय कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांची सुटका होईपर्यंत हा मोर्चा थांबणार नाही. आपण पुढे जावे आणि इम्रान खानची सुटका होईपर्यंत मागे हटू नये.