दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ

लोकसभेत उमटले अदानी प्रकरणाचे पडसाद तर राज्यसभेत सभापती धनखर आणि विरोधी पक्षनेते खरगे यांच्यात खडाजंगी.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th November, 04:04 pm
दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली : आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ झाला. अदानी मुद्द्यावरून काँग्रेस खासदारांनी लोकसभेत गदारोळ केला. तर राज्यसभेत या मुद्द्यावरून सभापती धनखर आणि विरोधी पक्षनेते खरगे  यांच्यात जोरदार वादावादी झाली. लोकसभेत काँग्रेस नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यासोबतच समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचाराचा मुद्दाही उपस्थित केला. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही अदानी मुद्द्यावरून गदारोळ झाला. अधिवेशनाच्या  सुरुवातीलाच  राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात जोरदार चर्चा झाल . राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त खासदारांनी शिष्टाचार जपण्याचे आवाहन सभापती धनखर यांनी केले. तर ७५ पैकी मीही ५४ वर्षे सभागृहात आहे. माझे योगदान दुर्लक्षित केले जाऊ नये,  असे खरगे यांनी उत्तर दिले. मी तुमचा खूप आदर करतो. तुम्ही असे बोलत आहा. प्रतिक्रियेवर दुःख व्यक्त करतो, असे धनखर यांनी खर्गे यांना सांगितले.  या तणावाच्या वातावरणामुळे राज्यसभेचे कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब करावे लागले. 

दरम्यान, आज संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी तृणमूल खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरल यांची भेट घेतली.  जेपीसी अध्यक्ष आमचे ऐकत नाहीत. याबाबतचा अहवाल घाईघाईने सादर करता येणार नाही असे  ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले. समितीचा कार्यकाळ वाढवू, असे आश्वासन सभापतींनी दिले आहे. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे सभापतींनी विरोधी खासदारांना सांगितले. 

अदानी समूहाशी संबंधित आरोपांवरून विरोधकांनी लोकसभेत गदारोळ केला. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी केली. अमेरिकेच्या न्यायालयात अदानी समूहावर लाचखोरीच्या आरोपांमुळे संसदेतील वातावरण आणखी तापले. पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर संसद विस्कळीत करण्याचा आणि जनतेच्या अपेक्षा मोडल्याचा आरोप केला.  

या अधिवेशनात खासदार डिजिटल पेनने त्यांची उपस्थिती चिन्हांकित करतील . संसदेचे कामकाम पूर्णतः  पेपरलेस करण्याच्या दिशेने हे नवे पाऊल उचलण्यात आले आहे. संसदेच्या लॉबीमध्ये इलेक्ट्रॉनिक टॅब लावण्यात आले आहेत. मात्र, पारंपरिक हजेरी नोंदवह्या देखील उपलब्ध असतील.

हेही वाचा