पूजा नाईकविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद; महिलेला ६ लाखांचा गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th November, 12:21 am
पूजा नाईकविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद; महिलेला ६ लाखांचा गंडा

म्हापसा : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कालापूर-तिसवाडी येथील एका महिलेला ६ लाखांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पणजी पोलिसांनी संशयित आरोपी पूजा नाईक हिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

सुषमा सदाशिव नाईक (रा. खुर्साच, कालापूर) यांनी पोलिसांत बुधवार, दि. १३ रोजी तक्रार दिली होती. हा फसवणुकीचा प्रकार दि. ५ ते ९ सप्टेंबर २०२० मध्ये घडला होता. संशयित आरोपीने फिर्यादीला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्याबदल्यात वरील काळात तिच्याकडून ६ लाख रूपये रक्कम घेतली. मात्र, आजपर्यंत नोकरी दिली नाही किंवा घेतलेले पैसे परत केले नाहीत. हा पैसे देवाणघेवाणचा प्रकार पणजी येथे घडला.

पोलिसांनी संशयित पूजा नाईक विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ४२० कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. 

हेही वाचा