गोवा। बाळ्ळी जाळपोळ प्रकरणातील संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

सीबीआयच्या गोवा विभागाची रियाधमध्ये कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 11:57 pm
गोवा। बाळ्ळी जाळपोळ प्रकरणातील संशयित बरकत अलीला सौदी अरेबियातून अटक

म्हापसा : २०११ साली बाळ्ळी येथील आंदोलनावेळी दोन आदिवासी युवकांच्या मृत्यू प्रकरणातील संशयितांपैकी विदेशात फरार झालेल्या बरकत अली (४७) यास सीबीआयच्या गोवा विभागाने अटक केली. २०१५ मध्ये संशयित आरोपी साैदी अरेबिया या देशात फरार झाला होता.


२५ मे २०११ रोजी बाळ्ळी-काणकोण येथे झालेल्या आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले व त्याचे रूपांतरण जाळपोळीत झाले. यात मंगेश गावकर (काणकोण) व दिलीप वेळीप (केपे) यांचा जळून मृत्यू झाला. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने १४ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१२ मध्ये हे प्रकरण सीबीआयला हस्तांतरित करण्यात आले. सीबीआयने चौकशीअंती हे प्रकरण सदोष मनुष्यवधाखाली नोंद करून नवीन आरोपपत्र सादर केले होते.

याप्रकरणी न्यायालयाने फरार संशयित बरकत अली याला वगळून इतर संशयितांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती.