होंडा येथील खाणपट्टा अग्रवंशी प्रायव्हेट लिमिटेडकडे!

कुर्पे-सुळकर्णे येथील खाण पट्ट्याचा आज लिलाव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November, 12:38 am
होंडा येथील खाणपट्टा अग्रवंशी प्रायव्हेट लिमिटेडकडे!

पणजी : होंडा येथील खाण पट्टा अग्रवंशी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १२५.३० टक्के बोली लावत जिंकला. कुर्पे-सुळकर्णे येथील खाण पट्ट्याचा गुरुवारी लिलाव होईल, अशी माहिती खाण संचालक नारायण गाड यांनी बुधवारी ‘गोवन वार्ता’शी बोलताना दिली.

होंडा येथील खाण पट्ट्यासाठीच्या अंतिम लिलावासाठी अग्रवंशी प्रा. लि. या कंपनीसह काय इंटरनॅशनल, जेएसडब्ल्यू, चौगुले आणि किलोस्कर या कंपन्या स्पर्धेत होत्या. त्यात अग्रवंशी प्रा. ​लि. कंपनीने १२५.३० टक्के बोली लावत हा खाणपट्टा स्वत:च्या ताब्यात आणण्यात यश मिळवले. सरकारने ज्या तीन खाण पट्ट्यांचा लिलाव करण्याचे निश्चित केले होते, त्यातील कुर्पे-सुळकर्णे या खाण पट्ट्याचा लिलाव शिल्लक असून, तो गुरुवारी होणार असल्याचेही गाड यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा