एससी, एसटी छळवणुकीची २२८ प्रकरणे प्रलंबित; १२ प्रकरणे निकालात

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
एससी, एसटी छळवणुकीची २२८ प्रकरणे प्रलंबित; १२ प्रकरणे निकालात

पणजी : राज्यात पाच वर्षांत अनुसुचित जमाती आणि अनुसुचित जाती (SC/ST) यांनी दाखल केलेली छळवणुकीची २२८ प्रकरणे अजून प्रलंबित आहेत. केवळ १२ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. 

२२८ प्रकरणांमधील ५५ टक्के प्रकरणे ही अनुसुचित जाती समुदायाची आहेत. लोकसभेत (Loksabha) केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोत (Natioanl Crime Records Bureau (NCRB))  दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०१९ ते २०२३ पर्यंत ३३ नवी प्रकरणे एससी/एसटी कायद्याखाली नोंद झाली आहेत.

२२८ प्रकरणांची सुनावणी चालू आहे. १२ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. जी प्रकरणे निकाली काढण्यात आली त्या प्रकरणांत कसल्याच खोट्या तक्रारी नोंद झालेल्या नाहीत.  २२८ मधील अनुसुचित जातीची १२७ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. ७ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. २१ नवी प्रकरणे या काळात नोंद झाली आहेत. वर्षाला सरासरी ३ ते ४ नवी प्रकरणे नोंद झाली आहेत. तर वर्षाला सरासरी १ ते २ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. 

अनुसुचित जमातीची १०१ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. आणि केवळ ५ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत. १२ नवी प्रकरणे या काळात नोंद झाली आहेत. वर्षाला सरासरी १ ते २ नवी प्रकरणे नोंद झाली आहेत. वर्षभरात १ ते २ प्रकरणे निकालात काढण्यात आली आहेत

अनुसुचित जाती

वर्ष  नवी प्रकरणे निकालात प्रलंबित 

2019 3 2 21

2020 2 0 22

2021 4 1 24

2022 8 2 29

2023 4 2 31

अनुसुचित जमाती

वर्ष नवी प्रकरणे निकालात प्रलंबित 

2020 2 0 19

2021 5 1 22

2022 1 1 22

2023 2 2 21















हेही वाचा