स्टारलिंकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

पणजी : गोव्यातील (Goa) ग्रामीण भागासहीत समुद्र किनारी (Coastal Belt) भागात स्टारलिंक कंपनीतर्फे (Starlink company) ‘हायस्पीड इंटरनेट’ सेवा पुरवण्यात येणार आहे. इंटरनेट (Internet) सेवेसहीत राज्यात डिजीटल (Digital) सुविधा निर्माण करण्यासंदर्भात चर्चा झाली. स्टारलिंक कंपनीचे वरिष्ठ ‘बिजनेस ऑपरेशन्स’ प्रमुख लॉरेन ड्रेयर यांच्याकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची चर्चा झाली. यावेळी माहिती तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे उपस्थित होते.
राज्यात डिजीटल सेवा उपलब्ध करण्याबरोबरच पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी स्टारलिंक (स्पेस एक्स) कंपनी इच्छुक आहे. या विषयी कंपनीचे वरिष्ठ ‘बिजनेस ऑपरेशन्स’ प्रमुख लॉरेन ड्रेयर यांच्याकडे चर्चा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
शैक्षणिक संस्था, आरोग्य केंद्रे, मच्छीमार तसेच ग्रामीण भागात सॅटलाईटवर आधारीत इंटरनेट सेवा पुरवठा स्टारलिंकतर्फे करण्यात येणार आहे. पर्यटन, मॅरीटाइम ऑपरेशन्स व आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यावळीत ही स्टारलिंकच्या सहकार्याने पायाभूत सुविधा तयार होणार.
राज्या ग्रामीण भागात इंटरनेट सेवा व्यवस्थित नाही. अजूनही काहीकडे मोबाईल रेंज मिळत नाही. याचा फटका शिक्षण संस्था तसेच आरोग्य सेवेला बसतो. या पार्श्वभूमीवर स्टारलिंकने सॅटलाईटच्या आधारे इंटरनेट सेवा दिल्यास ग्रामीण भागात लोकांना दिलासा मिळेल.