२०१७ च्या निवडणुकीत विजयने केला होता गोमंतकीयांबरोबर प्रॅंक : मनोज परब


48 mins ago
२०१७ च्या निवडणुकीत विजयने केला होता गोमंतकीयांबरोबर प्रॅंक  : मनोज परब

पणजी : भाजपला शिव्या घालणारे विजय सरदेसाई यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देवून गोमंतकीयांकडे प्रॅंक केले होते. हेच प्रॅंक  विजय सरदेसाई २०२७ च्या निवडणुकीत करणार. त्यासाठी विजयवर विश्वास ठेवण्यापूर्वी गोमंतकीयांनी १०० वेळा विचार करावा, अशी टीका आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांनी सरदेसाई यांना पत्युत्तर देताना केली. 

आरजीपीने गोमंतकीयांबरोबर प्रॅंक  केले आणि या प्रॅंकस्टरा सोबत युती कसली, असा टोमणा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मनोज परब यांना मारला होता. सरदेसाई यांना पत्युत्तर देताना परब म्हणाले की, आम्हाला प्रॅंकस्टर संबोधणारे विजय सरदेसाई यांनी २०१७ ला समस्त गोमंतकीयांबरोबर प्रॅंक केले होते. 

भाजपला शिव्या घालून त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवून स्वत: निवडून येऊन व आपले आमदार निवडून आणून भाजपला पाठिंबा देवून सर्व गोमंतकीयांबरोबर प्रॅंक  करीत भाजपचे सरकार घडविले होते. आता हेच सरदेसाई प्रॅंकच्या गोष्टी करीत आहेत. आम्ही सरदेसाई यांचा पोपट केल्याने त्यांचे मन दुखावले. कित्येक बनावट सोशल मिडिया अकाऊंट फातोर्डा येथून चालवून स्वत:चा बचाव करीत असल्याचा आरोप परब यांनी केला. 

केवळ २०१७ च नव्हे तर २०२५ मध्ये कॉंग्रेसच्या फुटीर माजी आमदाराला परत पक्षात घेवून आणखी एक प्रॅंक  केला आहे. गोमंतकीयांनी सरदेसाई यांच्या शब्दावर विश्वास ठेवण्यापूर्वी १०० वेळा विचार करावा. हा एक प्रॅंकस्टर आहे. केवळ २०१७ च नव्हे २०२५ मध्ये प्रॅंक  केले आहे व २०२७ मध्ये प्रॅंक करणार असा टोमणा परब यांनी मारला. 


हेही वाचा