वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील भंगारअड्ड्याला भीषण आग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न, जीवितहानी नाही

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
वेर्णा औद्योगिक वसाहतीमधील भंगारअड्ड्याला भीषण आग

पणजी : वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका भंगार अड्ड्याला आज शुक्रवार, १२ डिसेंबर रोजी दुपारी  भीषण आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या आगीची तीव्रता मोठी असून, औद्योगिक परिसराची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.





आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भंगार साहित्याच्या मोठ्या ढिगाऱ्यामुळे आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून, या घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.





मागील घटनांमुळे वाढती चिंता

वेर्णा आणि झुआरी परिसरामध्ये आगीच्या घटना वारंवार घडत असल्याने औद्योगिक सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ही ताजी आग नागरिकांची आणि उद्योजकांची चिंता वाढवणारी आहे. विशेषतः, मागच्याच महिन्यात १९ नोव्हेंबर रोजी तसेच ३० नोव्हेंबर रोजी झुआरीनगर भागात असलेले भंगार अड्डे भक्ष्यस्थानी पडले होते. तसेच यात कोट्यवधि रुपयांची हानी झाल्याचे समोर आले होते. या लागोपाठच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, २२ दिवसांत तिसऱ्यांदा आग लागली आहे. 




बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा